शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ हवामानामुळे कांद्यावर रोगांचा प्रादुर्भाव रब्बी हंगाम संकटात : बळीराजाचे आर्थिक नियोजन कोलमडनार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 17:35 IST

सटाणा : बागलाणच्या पश्चिम पट्यात ढगाळ हवामानमुळे व मर रोगाने कांदा खराब होत असून, महागडी औषधांची फवारणी करून कांदा वाचविन्याचा प्रयत्न बळीराजा करत आहे. यामुळे रब्बी हंगाम संकटात असून, शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडणार आहे.

सटाणा : बागलाणच्या पश्चिम पट्यात ढगाळ हवामानमुळे व मर रोगाने कांदा खराब होत असून, महागडी औषधांची फवारणी करून कांदा वाचविन्याचा प्रयत्न बळीराजा करत आहे. यामुळे रब्बी हंगाम संकटात असून, शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडणार आहे.कसमादे पट्ट्यात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली जाते. कांदा पिकाकडे शेतकरी आकर्षित झाले आहेत. कांदा हे तीन ते चार महिन्यांत येत आहे. नगदी पीक म्हणून या पिकाकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात वळले आहेत. कांद्याला चालू वर्षी सुरुवातीपासून बाजारभाव चांगला असल्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी समसमान क्षेत्र लागवड होणार आहे, पण निसर्गाच्या लहरीपणा आणि हवामानाचा हट्टीपणा बळीराजाचा पिच्छा सोडण्यास तयार होत नाही. परिणामी, महागडी औषधांची फवारणी करून कांदा पीक वाचविण्याच्या प्रयत्नात बळीराजा दिसत आहे.कमी खर्चात चांगले उत्पन्न देणारे भाजीपाला पिकेही या वर्षी कवडीमोल भावात विकले जात असल्याने, परिसरातील बळीराजा दुहेरी संकटात सापडला आहे. सुरुवातीला चांगले वातावरण असल्यामुळे पिके जोमात होती, पण गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अचानक वातावरणामध्ये बदल झाल्यामुळे, ऐन जोमात असलेल्या कांदा पिकांवर्ती मावा, तुडतुडे, पिवळेपणा, गेड्या वाळणे असे अनेक रोग अट्याक करत आहे.पिके वाचविण्याचे आव्हानरोप वाचण्यापासून शेतकऱ्यांचा संघर्ष सुरू आहे. कांदा लागवड करून लगेच दुसरे संकट मर रोगाचा प्रादुर्भाव. गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे परिसरातील शेतकरी हतबल झाला आहे. रबी हंगामातील पिकांची लागवड केली खरी, पण बदलत्या हमानामुळे शेतकऱ्याच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालल्याने पिके वाचविण्याचे बळीराजापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.माझा दोन एकर कांदा लागवड करून एक महिने झाले आहेत. सुरुवातीपासून कांद्याला मर रोगाने ग्रासले आहे. बदलत्या हवामानामुळे कांद्यावर अनेक रोग चाल करत आहेत. महागडी फवारणी करूनही हवामान साथ देत नाही.- संतोष बागुल, कांदा उत्पादक, वटार 

टॅग्स :onionकांदा