शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

कांदा पिकावर रोगाचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 01:30 IST

मांडवड : एकीकडे कोरोनाने थैमान घातल असून दुसरीकडे कांदा पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. सध्या कांद्याचा दर वधारत असुन नांदगाव तालुक्यातील शेतकरी हा नवीन कांदा (लाल कांदा) लागवडीसाठी जोमाने लढत आहे.

ठळक मुद्देशेतकरी हवालदिल : शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी

मांडवड : एकीकडे कोरोनाने थैमान घातल असून दुसरीकडे कांदा पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. सध्या कांद्याचा दर वधारत असुन नांदगाव तालुक्यातील शेतकरी हा नवीन कांदा (लाल कांदा) लागवडीसाठी जोमाने लढत आहे. मात्र लागवड झालेल्या कांदा पिकावर काही तरी अज्ञात रोगाने थैमान घातले आहे. त्यामुळे नुकसानीने बळीराजा हैराण झाला आहे. नांदगाव तालुक्यातील लक्ष्मीनगर येथील शेतकरी दिगंबर अम्रुता घाडगे यांच्या शेतातील दोन एकर शेतात कांद्याचे घरचेच असलेले उळ (कांदा बी)टाकले. त्याची देखभाल करत त्याची लागवडही केली मात्र लागवड केलेले कांदा रोप अचानक आपली मान टाकत आहे. त्या रोपांची प्रतिकार शक्तीच कमी होऊन ते पुर्णपणे बसुन जात आहे. हा प्रकार समजत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कांदा लागवडीपासुन तर बाजारात नेण्यापर्यत शेतकऱ्यांना खूप मेहनत घ्यावी लागते.असा येतो खर्चसाधारण एक एकराला : कांदा बियाणे तीस हजार रूपयांचे लागते. त्यानंतर कांदा लागवड सात ते आठ हजार रूपये मजूरी लागते. औषधे व खते सात ते आठ हजारापर्यंत असा एका एकरासाठी साधारण पन्नास ते साठ हजार इतका खर्च येतो. शिवाय रात्री व अपरात्री कांद्याला पाणी भरण्यासाठी डोळ्यात तेल घालून उभे राहावे लागते. इतकी सगळी मेहनत आणी खर्च करुन शेतातील कांदा पिक हे नष्ट होतांना दिसत आहे. तेव्हा याची दाद मागायची कोणाकडे हा प्रश्न उपस्थित झाला आहे. शासनाने सदर पिकांचे पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी दिगंबर घाडगे व परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.लक्ष्मीनगर येथे कांदा पिक अचानक खराब झाल्यानंतर फवारणी करतांना दिगंबर घाडगे. (१४ मांडवड)मी स्वत: दोन एकर कांदा लागवड केली असुन माझ्या शेतातील कांदा पिक बसून जात आहे. तेव्हा शासनाने पिकाचे पंचनामे करुन भरपाई द्यावी ही आमची मागणी आहे.-दिगंबर भोकनळ,शेतकरी सध्याचे वातावरण हे कांदा पिकासाठी प्रतिकूल नसून शेतकºयांनी कांदा लागवडीसाठी घाई करु नये. शिवाय गादी वाफा करुन लागवड करावी. आम्ही स्वत: पहाणी करून मार्गदर्शन करू.जगदीश पाटील, कृषीआधिकारी, नांदगाव

 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी