लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : रस्त्यावरील बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलिसांनी सातत्याने दंडात्मक कारवाई सुरू ठेवली आहे. जुलै महिन्यात तब्बल २१ हजार ६०० बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करत वाहतूक पोलिसांनी ५३ लाख ९६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.शहर व परिसरात पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान पोलिसांनी विना सीट बेल्ट वाहन चालविणाºया ४ हजार ४९८ तर विना हेल्मेट दुचाकी चालविणाºया ३ हजार १४४ वाहनचालकांवर कारवाई केली आहे. या दोन्ही कारवायांमध्ये अनुक्रमे आठ लाख ९९ हजार ६०० तर १५ लाख ७२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे नो-पार्किंग झोनमध्ये वाहने उभी करणाºया तीन हजार चारशे लोकांवर कारवाई करत सहा लाख ८१ हजार ४०० तर ५१ मद्यपी वाहनचालकांकडून ७६ हजारांचा दंड पोलिसांनी वसूल केला आहे.
बेशिस्त नाशिककरांकडून ३१ दिवसांत ५३ लाखांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 23:21 IST