शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

‘ओतूर’ ओव्हरफ्लो

By admin | Updated: August 6, 2016 22:50 IST

‘ओतूर’ ओव्हरफ्लो

ओतूर : कळवण तालुक्यातील ओतूर धरण गेल्या सामवारी पाण्याने पूर्णपणे भरले असून, ओव्हरफ्लो झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.आतूर परिसरातील वीस गावांना या धरणाच्या पाण्याचा फायदा होतो. या शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या धरणामध्ये यावर्षी ९७ दशलक्ष घनफूट पाण्याचा साठा झाला आहे. दररोज हजारो क्युसेस पाण्यचा विसर्ग होत असून, मार्कंडेय नदी दुथडी भरून वाहात आहे. परिसरातील काही शेतकऱ्यांच्या जमिनी अति पावसामुळे उपळल्या असून, शेतीतून पाणी वाहात आहे. त्यामुळे खरीपांचे काही प्रमाणात नुकसान होणार आहे. गेल्या रविवारी व सोमवारी पुनर्वसू नक्षत्राच्या शेवटच्या चरणात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली आहे. आता आश्लेषा नक्षत्रानेही पावसाची हजेरी लावली आहे. गेल्या चार ते पाच वर्षात ओतूर धरणात एवढे पाणी आले नव्हते. नदीकाठच्या शेतकऱ्यांना प्रशसनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. सदर मार्कंडेय नदी पुढे कळवण खुर्द गावाजवळ बेहडी नदीस मिळते व पुढे त्या गिरणा नदीत विलीन होतात. पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. परिसरातील विहिरी पाण्याने तुडुंब भरल्याने त्याचा खरीप पिकांना फायदा होणार आहे. या धरणामुळे शेतीच्या पाण्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. बऱ्याच शेतरक्यांच्या शेतात पूरपाणी घुसल्याने शेतीचे नुकसान झाले असून, पर्यायाने पिकांचे नुकसान झाले आहे. दोन तीन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे ओतूर धरणासह परिसरातील लहान मोठी पाझर तलावही पाण्याने भरली आहेत. या पावसामुळे आदिवासी व परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच ओतूर धरण भरल्याने व नदीला पहिला पूर आल्याने पाय रस्ते वाहून गेले आहेत. डोंगर उतारावरून माती वाहून आल्याने सर्व रस्ते चिखलमय झाले आहेत. काही रस्त्याच्या साईड पट्ट्या व मातीचा भराव वाहून गेला आहे. (वार्ताहर)नाशिक मनपाकडून नुकसानीचे पंचनामे सुरूनाशिक : गेल्या मंगळवारी (दि. २) शहरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे तसेच गोदावरीला आलेल्या महापुरामुळे ठिकठिकाणी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास शुक्रवारी सुरुवात झाली. दिवसभरात सुमारे २५० पंचनामे करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालय आणि महापालिका यांच्या वतीने घरांचे, दुकानांचे तसेच धान्य व इतर मालमत्ता यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहे. त्यासाठी १० पथके तैनात करण्यात आली आहेत. शिवाजीवाडी येथे २१० पंचनामे तर नाशिक-पुणे महामार्गावरील आंबेडकरवाडी येथे ४० पंचनामे करण्यात आले. (प्रतिनिधी)