शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर एकनाथ शिंदे तुरुंगात जातील किंवा तडीपार होतील; संजय राऊतांचा इशारा
2
Smriti Irani : "हिंमत असेल तर भाऊ-बहिणीने..."; स्मृती इराणींचं राहुल-प्रियंका गांधींना खुलं आव्हान
3
‘मोदींचं मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडलंय, भाजपानं त्यांच्यावर…’, संजय राऊतांची बोचरी टीका 
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे खर्च करतात आपला पगार?; मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दिली माहिती
5
३ दहशतवादी ठार, ४० तास चालली चकमक; लष्कराची मोठी कारवाई
6
'लोकसभेवेळी सर्वांचं आय लव्ह यू असतं. मात्र विधानसभेवेळी...', गुलाबराव पाटील यांचं सूचक विधान, रोख कुणाकडे, चर्चांना उधाण
7
चंद्रकांत पाटलांनी बारामतीमध्ये शरद पवार यांच्याबाबतीत बोलायला नको होते; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
9
मराठी-गुजराती वादाची 'राजकीय फोडणी'; घाटकोपरच्या 'त्या' सोसायटीतील रहिवाशी म्हणतात...
10
राजकारण तापले उद्धव सेनेच्या जिल्हाप्रमुख बडगुजर यांना हद्दपारची नोटीस
11
प्रसिद्ध दिग्दर्शक संगीत सिवन काळाच्या पडद्याआड, रितेश देशमुख - श्रेयस तळपदेने वाहिली श्रद्धांजली
12
'महाराष्ट्रात कंपनी उघडी ठेवायची असेल तर..; गुजराती कंपन्यांना उद्धव ठाकरेंचा इशारा
13
भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचं खुलं पत्र; अभिनेत्री रेणुका शहाणेंना सुनावले खडे बोल
14
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरणीचं सत्र सुरूच; Hero Motocorp मध्ये तेजी, डॉ. रेड्डीज घसरला
15
सोनालीच्या जगण्याची होती ३० टक्के शक्यता; मृत्युच्या दारातून परतलेल्या अभिनेत्रीने सांगितला कॅन्सरचा प्रवास
16
गुणरत्न सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याचा दणका; एसटी बँकेवरील संचालकपद रद्द
17
Paytm Share Price : आपटून 'ऑल टाईम लो'वर Paytm चा शेअर; IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर डोक्याला हात लावायची वेळ
18
मध्यंतर...पिक्चर अभी बाकी है दौस्त! घड्याळाचे काटे पवारांकडून ठाकरे-शिंदेंकडे वळले, शहरी मतदारांवर भिस्त
19
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
20
संपादकीय: ऋण काढून सण! बचत घसरली, आता कोण वाचविणार...

ओतुरची ग्रामसभा विविध प्रश्नावर गाजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 7:16 PM

ओतुर : कळवण तालुक्यातील ओतुर येथील ग्रामपंचायतीने घेतलेली विशेष ग्राम सभा विवीध विकास कामांच्या प्रश्नांवर गाजली.

ठळक मुद्देसर्व ठरावांची अंमलबजावणी करण्याचे ठरविण्यात आले.

ओतुर : कळवण तालुक्यातील ओतुर येथील ग्रामपंचायतीने घेतलेली विशेष ग्राम सभा विवीध विकास कामांच्या प्रश्नांवर गाजली.सदर सभेस विशेष म्हणजे ९ ग्रामपंचायत सदस्यांपैकी सरपंच शांताराम पवार, सदस्य दादाजी मोरे व निर्मला घोलप हे तीनच सदस्य उपस्थित होते, तर उपसरपंच कल्पना देसाई, सदस्य दादाजी सूर्यवंशी, मोतीराम मोरे, अहिल्या गांगुर्डे, मिना आंबेकर, संगिता बागुल आदी सहा सदस्य गैरहजर होते. कोरम पुर्ण नसतानीही ग्रामस्थांच्या आग्रहामुळे ग्राम सभा घेण्यात आली. सरपंच शांताराम पवार यांच्या अध्यक्षतेत ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी ग्रामसेवक के. एस. पवार यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन केले.सदर ग्रामसभेत विवीध प्रश्नावर चर्चा झाली, तयात पुढील ठराव करण्यात आले.गावातील पाणी टंचाई दुर करणे, सहा सदस्य गैरहजर राहिल्याने पंचायत बरखास्त करणे असे दादा मोरे यांनी सांगितले. गावातील कॉँक्रीटीकरण, स्मशानभुमी,गावातील पेयजल पाणीपुरवठा कामे, गावातील गटार कामे आदींची चौकशी करणे, धरणातील अवैध मोटरी बंद करणे, गावठाण हद्दीतील अतिक्र मण काढणे या सर्व ठरावांची अंमलबजावणी करण्याचे ठरविण्यात आले.सदर बैठकीतील चर्चेत दादा मोरे, रमेश रावले, अशोक देशमुख, देवा भुजाडे, डॉ. पंकज मेणे, समाधान देवरे, शहाबान पठाण, नागेश मोरे, उत्तम पवार यांनी सहभाग घेतला.सदर सभेस दत्ता सोनजे, योगेश सोनवने, राजु गवळी, जिभाऊ जाधव, प्रभाकर पवार, भाऊसाहेब मोरे, ज्ञानेश्वर पवार, कैलास भुजाडे, सजन अहिरे, दिपक गायकवाड, भगवान मोरे, प्रकाश सोनजे, बाळकृष्ण देशमुख, मधुकर देवरे, सुरेश घोलप, हरीभाऊ पगार, दत्तु मोरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.