शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

नाशकातील गजरा विक्रेता निघाला उस्मानाबादचा दरोडेखोर; कळममध्ये वॉचमनची केली होती हत्या...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 14:58 IST

५जून २०२१ साली कळम भागातील एका दरोड्यादरम्यान, वॉचमनची निघृणपणे हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी कळम पोलीस ठाण्यात खुनासह दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ठळक मुद्देकळमच्या गुन्ह्याची कबुली दिलीवॉचमनची निघृणपणे हत्या करण्यात आली होती

नाशिक : उस्मानाबाद जिल्ह्यातील कळम पोलीस ठाणे हद्दीत मागील महिन्यात एका दरोड्यादरम्यान, तेथील वॉचमनला संशयित दरोडेखोरांनी ठार मारुन पलायन केल्याची घटना घडली होती. तेथील पोलिसांनी संशयावरुन शहरातील मुंबईनाका पोलीस ठाण्यात येऊन येथील पोलिसांना माहिती दिली. या माहिती व संशयिताच्या वर्णनावरुन पोलिसांनी तपास सुरु केला असता नंदीनी नदीकाठालगत खुनाच्या गुन्ह्यातील एका संशयित आरोपीला मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने बेड्या ठोकल्या.कळम तालुक्यातील बहुतांश भटके लोक शहरात येऊन गजरा, कचरा संकलनाच्या पिशव्या विक्रीचा हातावरचा व्यवसाय करताना विविध सिग्नल व वर्दळीच्या चौकांमध्ये नजरेस पडतात. ५जून २०२१ साली कळम भागातील एका दरोड्यादरम्यान, वॉचमनची निघृणपणे हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी कळम पोलीस ठाण्यात खुनासह दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नाशिक शहरात मोठ्या संख्येने कळमचे भटके गजरा विक्रेते वास्तव्यास असल्याचे समजले. यानंतर एका पथकाने शहरात दाखल होऊन मुंबईनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक विजय ढमाळ यांची गुरुवारी (दि.१५) भेट घेतली. त्यांना गुन्ह्यासंबंधी आवश्यक ती सर्व माहिती आणि संशयित आरोपींचे वर्णनही कळम पोलिसांच्या पथकाने दिले. यानंतर पथक माघारी गेले. ढमाळ यांनी तत्काळ गुन्हे शोध पथकाला याबाबत तपासाचे आदेश दिले.

दरम्यान, द्वारका ते मुंबईनाक्यापर्यंत महामार्ग परिसरात गजराविक्री करणाऱ्या कुटुंबियांची चौकशी पोलिसांनी सुरु केली. तसेच साध्या वेशात संशयित कुटुंबियांवर पाळत पोलिसांकडून ठेवण्यात येत होती. संशयित सुनील नाना काळे (२७, रा. मुंबईनाका सर्कल, मुळ, रा. तेर, पारधी पेढी, ता. कळम) गुन्हेगार आला असता पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता काळे याने कळमच्या गुन्ह्याची कबुली दिली. पुढील तपासाकरिता त्यास कळम पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयArrestअटक