शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

‘आधार’द्वारे अनाथ बालकेही रेकॉर्डवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 23:59 IST

नाशिक : राज्यभरातील अनाथ बालकांसह विविध कारणांनी बालगृहात दाखल झालेल्या मुलांचे आधार तयार करून त्यांना रेकॉर्डवर आणण्याचा प्रयत्न असून, ...

नाशिक : राज्यभरातील अनाथ बालकांसह विविध कारणांनी बालगृहात दाखल झालेल्या मुलांचे आधार तयार करून त्यांना रेकॉर्डवर आणण्याचा प्रयत्न असून, यासंदर्भात भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडे (यूआयडीएआय) आयोगाने प्रस्ताव सादर केल्याची माहिती राज्य बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे यांनी दिली.बालहक्कांविषयीच्या समस्यांचा आढावा व त्यावरील उपाययोजनांची पडताळणीसाठी बालहक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे यांनी शनिवारी (दि.२७) नाशिकमधील बाल कल्याण समितीकडून जिल्ह्यातील स्थितीचाही त्यांनी आढावा घेतला. त्यानंतर शासकीय विश्रामगृहातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रवीण घुगे म्हणाले, बालकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी विविध कायदे अस्तित्वात असले तरी विविध कायद्यांमुळेही या प्रक्रियेत अडचणी येतात. त्यासोबतच मतिमंद मुले, अनाथ मुले, बालकामगार यांच्या समस्या वेगवेगळ्या आहे. त्यांच्यासाठी उपाययोजना करण्याची गरज असून, बालहक्कांचे संरक्षण करण्यासाठी कायद्यांची अंमलबजावणी करण्यासोबतच बालहक्क जोपासणे गरजेचे आहे. त्यासाठी समाजातील विविध घटकांनी आणि स्वयंसेवी संस्थांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येण्याची गरज असून, अशा संस्थांनी सामाजिक भावनेतून बालहक्क जोपासण्यासाठी काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.भीक देणारेही गुन्हेगारचबालहक्क आयोगासमोर रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलांच्या हक्कांचे संरक्षण करण्याचे मोठे आव्हान आहे. अनेकदा मुलांचे पालकच त्यांना भीक मागण्यासाठी प्रवृत्त करतात. भिक्षा प्रतिबंधक कायद्यानुसार भीक मागणाºया इतकाच भीक देणारा आणि भीक मागण्यास प्रवृत्त करणाराही गुन्हेगार असतो. याबाबत कारवाईची गरजही घुगे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :NashikनाशिकAdhar Cardआधार कार्ड