शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

४६ घरांमध्ये ‘एडीस’ डासांची उत्पत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 00:42 IST

वडाळागाव परिसरात चिकुनगुनियासदृश आजारासह विषमज्वर, विषाणूजन्य तापाची साथ पसरल्याने आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. येथील घरांची तपासणी सुरू करण्यात आली असून, आतापर्यंत ४६ घरांमध्ये ‘एडीस’ डासाच्या उत्पत्तीला पूरक असे पाण्याचे साठे आढळून आले आहेत.

नाशिक : वडाळागाव परिसरात चिकुनगुनियासदृश आजारासह विषमज्वर, विषाणूजन्य तापाची साथ पसरल्याने आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. येथील घरांची तपासणी सुरू करण्यात आली असून, आतापर्यंत ४६ घरांमध्ये ‘एडीस’ डासाच्या उत्पत्तीला पूरक असे पाण्याचे साठे आढळून आले आहेत. वडाळागाव परिसरात मिश्र आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. यामध्ये ६५ रुग्णांना सांधेदुखीचा त्रास जाणवत असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. रुग्णांमध्ये हिवतापाची लक्षणे दिसत नसली तरी चिकुनगुनिया संशयित रुग्ण असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. या भागात महापालिकेच्या आरोग्य व राज्य शासनाच्या शहर आरोग्य विकास विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून सातत्याने घरांना भेटी देत पाण्याचे साठे तपासले जात आहे. तसेच डासप्रतिबंधात्मक औषध-धूर फवारणीलाही प्रारंभ करण्यात आला आहे. दोन दिवसात ४६ नागरिकांच्या घरांमधील पाणीसाठ्यात एडीस डासाच्या अळ्या, कोष आढळून आल्याच्या नोंदी आरोग्य विभागाने घेतल्या आहेत. स्वच्छ पाणीसाठ्यामध्ये या डासाची उत्पत्ती होत असल्यामुळे पाण्याचे साठे उघडे न ठेवता ते दिवसाआड स्वच्छ करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे.  आरोग्य विभाग जरी जागा झाला असला तरी या विभागाला महापालिकेच्या अन्य विभागांची साथ मिळणे आवश्यक आहे. त्याशिवाय साथीच्या आजारावर मात करणे शक्य होणार नाही. येथील मनपा शाळेच्या परिसरातील कोळीवाडा, माळी गल्ली, संजरी मार्ग, गोपालवाडी, गरीब नवाज कॉलनी, राजवाडा, रजा चौक, केबीएच विद्यालयाचा परिसर, जय मल्हार कॉलनी या भागात दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. माळी गल्ली, बारा खोली, गरीब नवाज कॉलनी आदी परिसरातील पाण्याचे नमुने संकलित करण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.  जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळेत पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. गुरुवार (दि. २१) दुपारपर्यंत नमुन्यांचा अहवाल प्राप्त होण्याची शक्यता आहे. दूषित पाण्यावाटे पसरणारे आजारांचे निदान अहवालातून स्पष्ट होईल.दूषित पाण्यावाटे आजारांचा फैलाववडाळागावातील प्रभावित भागात काही ठिकाणी पाण्याला पिवळसर रंग दिसत आहे. पिण्याचे पाणी गढूळ मातीमिश्रित असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच काही परिसरांमध्ये पाण्याला दुर्गंधीही जाणवत असल्याचे रहिवाशांनी सांगितले. यामुळेदेखील पाण्यावाटे पसरणाºया आजाराचा फैलाव होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. येथील परिसरात जुनाट जलवाहिन्या असून, जलवाहिन्या या भूमिगत गटारींच्या शेजारून टाकण्यात आलेल्या आहेत. गटारींमधील सांडपाणी जलवाहिन्यांची अंतर्गत गळतीमधून मिसळत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Healthआरोग्य