शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

ताहफुज-ए-शरियत परिषदेचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 00:05 IST

आझादनगर : मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डास विश्वासात न घेता केंद्र सरकारद्वारे तीन तलाकबाबत मुस्लीम महिला (विवाहोत्तर संरक्षण) विधेयक २०१७ लोकसभेत मंजूर करून घेतल्याने मुस्लीम व्यक्तिगत कायद्यात केंद्राने डोकावण्यास प्रारंभ केला आहे. केंद्र सरकारच्या अनेक त्रुटींसह हा कायदा लादून मुस्लिमांच्या धार्मिक स्वातंत्र्य हिरावून घेण्याच्या कृतीच्या निषेधार्थ मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे अध्यक्ष मौलाना सैय्यद राबेहसन यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि. १७) शहरात ताहफुज-ए-शरियत परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे सचिव मौलाना उमरैन महेफुज रहेमानी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देमालेगाव : उमरैन महेफुज रहेमानी यांची माहितीकेंद्र सरकारच्या अनेक त्रुटींसह हा कायदा मुस्लिमांच्या धार्मिक स्वातंत्र्य हिरावून घेण्याच्या कृतीच्या निषेधा

आझादनगर : मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डास विश्वासात न घेता केंद्र सरकारद्वारे तीन तलाकबाबत मुस्लीम महिला (विवाहोत्तर संरक्षण) विधेयक २०१७ लोकसभेत मंजूर करून घेतल्याने मुस्लीम व्यक्तिगत कायद्यात केंद्राने डोकावण्यास प्रारंभ केला आहे. केंद्र सरकारच्या अनेक त्रुटींसह हा कायदा लादून मुस्लिमांच्या धार्मिक स्वातंत्र्य हिरावून घेण्याच्या कृतीच्या निषेधार्थ मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे अध्यक्ष मौलाना सैय्यद राबेहसन यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि. १७) शहरात ताहफुज-ए-शरियत परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे सचिव मौलाना उमरैन महेफुज रहेमानी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.मौलाना उमरैन महेफुज रहेमानी म्हणाले की, २२ आॅगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने एकाच वेळेस तीन तलाक देण्यास अवैध ठरवत केंद्र सरकारला यावर कायदा करण्याचे निर्देश दिले होते. मुस्लिम व्यक्तीगत कायदा मंडळ हे मुस्लिमांचे सर्वात मोठे व्यासपीठ आहे. परंतु केंद्र सरकारने तीन तलाकबाबत कायदा बनविताना बोर्डास काही एक न विचारता पुर्णत: अलिप्त ठेवून तीन तलाकबाबत कायदा करण्यासाठी घाई करीत सदोष विधेयक लोकसभेत मंजूर करून घेतले.नव्यानेच अस्तित्वात येणारा कायदा हा भारतीय दंड संहिताच्या विरोधात आहे. या कायद्याच्या कलम दोन नुसार एकाच वेळेस तीन तलाक दिल्यास ते अवैध मानले जाणार आहे तर कलम तीन नुसार ज्या व्यक्ती तीन वर्षाची शिक्षा देण्यात येणार आहे. त्यानुसार पतीस तीन वर्षे तुरूंगात डांबल्यास महिला व मुलांचे संगोपन कोण करणार? ज्यांचा मुलगा तुरूंगात जाणार ते कुटुंब त्या महिलेस स्वीकारून तिचा खर्च उचलेल का? असे अनेक गंभीर समस्या उद्भवणार आहेत.हा कायदा म्हणजे युनिफार्म सिव्हिल कोडकडे मार्गक्रमण करीत असल्याने धर्मानुसार जगण्याच्या अधिकाराची गळचेपी करीत आहे. म्हणून हा कायदा मुस्लिमांना कदापि मान्य नाही. याबाबत देशात मुस्लिम समाजास जागृत करण्याचे कार्य सुरू आहे. असे ते म्हणाले.