नाशिक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक, विश्वास बॅँक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी व विश्वास कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शनिवारी (दि. १९) सायंकाळी ६ वाजता चव्हाण प्रतिष्ठानच्या गंगापूररोडवरील विभागीय केंद्रात प्रसाद कुलकर्णी यांच्या ‘आपणही जिंकू शकतो’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम अतिशय प्रेरणादायी असून, कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनायक पाटील, सचिव अॅड. विलास लोणारी, कोषाध्यक्ष विश्वास ठाकूर, डॉ. शोभा बच्छाव, माधवराव पाटील, गुरुमित बग्गा, सुधीर तांबे आदिंनी केले आहे. (प्रतिनिधी)