शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मेड इन मालेगाव फेस्टिव्हलचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 00:12 IST

शहर व तालुक्यातील विविध प्रकारच्या उद्योजकांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे व उत्पादित झालेल्या उत्पादनांचा प्रचार व प्रसार व्हावा या हेतूने दि. २६ ते ३० जानेवारी २०१८ दरम्यान मेड इन मालेगाव फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आमदार आसिफ शेख यांनी दिली. शहरातील दरेगाव शिवारातील रिलायबल इस्टेट येथील १० एकर क्षेत्रावर हे फेस्टिव्हल भरविण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे. मालेगाव शहरात रंगीत साडी, रुमाल, शर्टचे कापड, महिलांचे ड्रेस, अगरबत्ती अशा १०२ प्रकारच्या उत्पादनांची निर्मिती केली जाते.

मालेगाव : शहर व तालुक्यातील विविध प्रकारच्या उद्योजकांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे व उत्पादित झालेल्या उत्पादनांचा प्रचार व प्रसार व्हावा या हेतूने दि. २६ ते ३० जानेवारी २०१८ दरम्यान मेड इन मालेगाव फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आमदार आसिफ शेख यांनी दिली.शहरातील दरेगाव शिवारातील रिलायबल इस्टेट येथील १० एकर क्षेत्रावर हे फेस्टिव्हल भरविण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे. मालेगाव शहरात रंगीत साडी, रुमाल, शर्टचे कापड, महिलांचे ड्रेस, अगरबत्ती अशा १०२ प्रकारच्या उत्पादनांची निर्मिती केली जाते. तसेच शहराला खाद्यसंस्कृतीचा मोठा वारसा आहे. महिला बचत गटाच्या सदस्या विविध प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करीत असतात. शाकाहारी,  मांसाहारी खाद्यपदार्थांना मागणी असते. या वस्तूंचे व खाद्यपदार्थांचे या फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शन केले जाणार आहे. तसेच शाळा- महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.  शहर व तालुक्यातील उद्योजकांना मोठे मार्केट उपलब्ध व्हावे यासाठी मुंबई, सुरत, औरंगाबाद, इंदूर येथील उद्योजकांना निमंत्रित करून त्यांना मालेगाव शहरात उत्पादित झालेल्या वस्तूंची व मालाची माहिती दिली जाणार आहे.  या फेस्टिव्हलसाठी विविध क्षेत्रातील दोनशे सदस्यांची समिती गठित करण्यात आली आहे. राष्टÑीय व सामाजिक एकोपा वाढीस लागावा म्हणून या फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आल्याचे आमदार शेख यांनी सांगितले.  मालेगाव शहरातील दरेगाव शिवारातील रिलायबल इस्टेट येथील १० एकर क्षेत्रावर मेड इन मालेगाव फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येणार आहे. मालेगाव शहरात रंगीत साडी, रुमाल, शर्टचे कापड, महिलांचे ड्रेस, अगरबत्ती अशा १०२ प्रकारच्या उत्पादनांची निर्मिती केली जाते.