शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

संघटनशक्तीने शैक्षणिक क्षेत्रात बदल शक्य - सच्चिदानंद जोशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 01:07 IST

संघटनशक्तीच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात संजीवक बदल घडून आणता येऊ शकतो आणि भारतीय शिक्षण मंडळ त्यासाठी कायम प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन भारतीय शिक्षण मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सच्चिदानंद जोशी यांनी केले. 

नाशिक : संघटनशक्तीच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात संजीवक बदल घडून आणता येऊ शकतो आणि भारतीय शिक्षण मंडळ त्यासाठी कायम प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन भारतीय शिक्षण मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सच्चिदानंद जोशी यांनी केले.  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ येथे भारतीय  शिक्षण मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू ई. वायुनंदन यावेळी उपस्थित होते.   समाजाच्या अभिरु ची सध्या वेगाने बदलत आहेत, त्यामुळे संस्काराची जोपासना करणे हे आव्हानात्मक कार्य ठरले आहे. शिक्षणातून संस्काराची समाजात पाखरण करण्याचे काम भारतीय शिक्षण मंडळ सातत्याने पार पाडत असून, त्यासाठी समर्थ मनुष्यबळ तयार करण्याची गरज असल्याचे यावेळी जोशी म्हणाले, तर कुलगुरू ई. वायुनंदन यांनी शिक्षण क्षेत्रात व्यावसायिकीकरण झपाट्याने वाढत आहे आणि त्यामुळे भारतीय सत्व कमी होत आहे. समाजाची शिक्षणाशी असणारी नाळ तुटत असल्याने मूल्य नसलेले शिक्षण आज फोफावले आहे. या सर्व क्षेत्रात प्रचंड कार्य करण्याची गरज आहे, असे मत व्यक्त केले.मंडळाचे राष्टÑीय महामंत्री वामनरावजी गोगटे यांनी याप्रसंगी अहवाल सादर केला. प्रास्ताविक प्रांताध्यक्ष महेश दाबक यांनी केले. उमाशंकर पचोरी यांनी सूत्रसंचालन केले.  उद्घाटनानंतर संपन्न झालेल्या पहिल्या सत्रात पूर्ण मंडळ ते सुवर्णजयंती या विषयावर उद््बोधन करण्यात आले. या उपक्र माअंतर्गत २०२० पर्यंत भारतातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये भारतीय शिक्षण मंडळाची शाखा स्थापना करणे, विविध विद्यापीठे आणि महाविद्यालये येथे शाखा सुरू करणे आणि पाच लाख सदस्य नोंदणी करणे या संकल्पाची मांडणी करण्यात आली. भारतभरातून आलेल्या प्रतिनिधींनी त्यांच्या कार्याचा आढावा सादर केला. दुसऱ्या सत्रात वृत्त निवेदन आणि लेखन या विषयावर मुकूल कानिटकर आणि सच्चिदानंद जोशी यांनी मार्गदर्शन केले.

टॅग्स :educationशैक्षणिक