शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नर तालुक्यात महिलांनी साकारल्या सेंद्रिय परसबाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 15:31 IST

नांदूरशिंगोटे : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ''उमेद'' अंतर्गत सिन्नर तालुक्यात महिला स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून परसबागांची निर्मिती करण्यात आली. भोजापूर खोरे परिसरातील कासारवाडी येथे उपक्रम राबविण्यात आला.

नांदूरशिंगोटे : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ''उमेद'' अंतर्गत सिन्नर तालुक्यात महिला स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून परसबागांची निर्मिती करण्यात आली. भोजापूर खोरे परिसरातील कासारवाडी येथे उपक्रम राबविण्यात आला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. लीना बनसोड, प्रकल्प संचालक उज्वला बावके, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात महाराष्ट्र जीवनोन्नती अभियानातंर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तालुक्यात महिला समूहाच्या सहाय्याने विविध ठिकाणी सेंद्रिय पध्दतीच्या परसबागा तयार करून प्रत्येक कुटुंबाला विषमुक्त पालेभाज्या व फळभाज्या उपलब्ध करुन देण्याचा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. या परसबागांत लागवड करण्यासाठी गावरान वांगी, पालक, मेथी, भेंंडी, टोमॅटो, कोथिंबीर, गवार, कारली, घेवडा, वाल, शेपू, मिरची, आलू, कोरफड, वाल, पुदिना, फुलझाडे आदीसह विविध वाणांची लागवड करण्यात येत आहे. आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक म्हणून जास्तीत जास्त परसबाग तयार करण्यात येणार असल्याचे समन्वयकांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य ग्रामीन जीवनोन्नती अभियाना अंतर्गत स्थापन केलेल्या स्वयंसहायता समूहातील महिलांनी या उपक्रमात सहभाग घेतला. कासारवाडी येथे शिला लोहकरे यांच्या शेतजमिनीत परसबाग अभियान राबविण्यात आले. यावेळी तालुका व्यवस्थापक नितीन कापुरे, विजय कुटे, कस्तुरा गवारे, प्रभाग समन्वयक युवराज चव्हाण, अविनाश राठोड, ज्ञानेश्वर डावरे आदीसह महिला बचतगटाच्या सदस्य उपस्थित होत्या.-----------------------------गरोदर माता, स्तनदा माता यांना सकस आहार, कुपोषण मुक्त कुटुंब यासाठी दैनंदिन जीवनात विविध प्रकारच्या पालेभाज्या व फळभाज्यांंचा वापर व्हावा यासाठी परसबाग लागवड करणे आवश्यक आहे.-नितीन कापुरे, तालुका व्यवस्थापक

टॅग्स :Nashikनाशिक