शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी महिला मंडळाने फुलविली सेंद्रिय परसबाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 13:17 IST

पिंपळगाव बसवंत (गणेश शेवरे) : आहारासाठी लागणारा भाजीपाला विषारी खतांपासून मुक्त असावा व तो सहज उपलब्ध व्हावा, या हेतूने आहेरगाव येथील आदिवासी महिलांनी परसबाग फुलविली आहे.

पिंपळगाव बसवंत  : आहारासाठी लागणारा भाजीपाला विषारी खतांपासून मुक्त असावा व तो सहज उपलब्ध व्हावा, या हेतूने आहेरगाव येथील आदिवासी महिलांनी परसबाग फुलविली आहे. त्यातून पूर्णपणे सेंद्रिय व कंपोस्ट खतांच्या वापरातून पिके घेतली जात आहेत.आहेरगाव येथील शेतकरी नानुबाई गवळी यांनी आपली जागा महिला मंडळाला उपलब्ध करून देत या जागेत नांगरण, माती टाकणे, संरक्षक कुंपण घालण्यासाठी निधी देखील ग्रामपंचायतने उपलब्ध करून दिला आहे.काट्या कुट्या असलेल्या जागेची मशागत केली. त्यात माती टाकून नांगरून वाफे बनविणे त्या वाफ्यांना विटा लावणे , प्राण्यांपासून बागेचे संरक्षण होण्यासाठी सभोवती कुंपण घातले आहे. यासाठी ग्रामपंचायत निधी उपलब्ध करून दिला सुरवातीला जुन्या साड्या, गोणपाट, युरियाची पोती, बांबू अशा वस्तूंचा वापर करण्यात आला. पण ग्रामपंचायतने सहकार्य केल्याने एक गोलाकार स्ट्रक्चर तयार करण्यात आले व सुंदर अशी परस बाग तयार केली. त्या परस बागेच्या गोेलाकार रचनेमध्ये बाहेरील गोलामध्ये वांगी ,कांदे लसूण,पपई व शेवगा, मधल्या टप्प्यात वांगी, टोमॅटो,मिर्ची मध्यभागी मिरची मेथी ,कांदे ,भेंडी , डिंगऱ्या,आळु, चटकचदणी वेल, लाल बिट,गाजर,वांगी ,पुदिना, पालक, तर शेवंती ,चणीगुलाब ,मोगरा,झेंडूची फुलेआदी फुलांची देखील लागवड केली आहे. यासाठी आहेरगाव येथील ग्रामपंचायत ,पोलिस पाटील व जिजामाता ग्रामसंघ महिला मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले आहे.------------------------------दर्जेदार भाजीपाला निर्मितीचा उद्देशरासायनिक खतांचा वापर टाळून सेंद्रिय खते, शेण, राख,लसूण व कडू लिंबाच्या पानाचा रस कुटून त्यात गाईचं गोमूत्र टाकून २१ दिवस आंबवले जाते व २२ व्या दिवशी सकाळी ते औषध फवारले जातात व विना रासायनिक पिके घेतले जातात. त्यामुळे येथील जमिनीचा पोत सुधारणे, पाण्याची बचत, मातीची धूप रोखणे, जलधारणशक्ती वाढविणे असे अनेक फायदे होत असून विषमुक्त भाजीपाला निर्मिती होत असल्याची माहिती या मंडळाच्या अध्यक्ष सविता गांगुर्डे ,संगीता बागुल व विद्या देशमुख यांनी दिली......................................हा परसबागा फुलविण्यासाठी ग्रामपंचायत व जागा मालक गवळी यांनी मदत केली. शासनाने देखील मदत केली तर आहरेगावतच नाहीतर प्रत्येक गावात सेंद्रिय भाजीपाला निर्मिती करणारे परस बाग तयार होतील. त्याचा आरोग्यासाठी देखील उपयोग होईल.-सविता गांगुर्डे, महिला मंडळ अध्यक्ष

टॅग्स :Nashikनाशिक