शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

५० वराहांचे रक्तजल नमुने घेण्याचे दिले आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 00:15 IST

केरळमध्ये पसरलेल्या ‘निपाह’ विषाणूच्या संसर्गामुळे राज्य शासनाच्या पशुसंवर्धन आयुक्तालयाने प्रादेशिक पशुसंवर्धन व आयुक्त कार्यालयापासून तर सर्व विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळांना जिल्हानिहाय ५० डुकरांचे रक्तजल नमुने सर्वेक्षणासाठी पाठविण्याचे आदेश दिले आहेत.

नाशिक : केरळमध्ये पसरलेल्या ‘निपाह’ विषाणूच्या संसर्गामुळे राज्य शासनाच्या पशुसंवर्धन आयुक्तालयाने प्रादेशिक पशुसंवर्धन व आयुक्त कार्यालयापासून तर सर्व विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळांना जिल्हानिहाय ५० डुकरांचे रक्तजल नमुने सर्वेक्षणासाठी पाठविण्याचे आदेश दिले आहेत. केरळमध्ये पसरलेल्या निपाह या झुनोटिक विषाणूजन्य रोगाचा संसर्ग माणसांमध्ये दिसून आला आहे. या रोगाचा प्रसार वटवाघळांची विष्ठा, लाळ व मूत्राद्वारे डुकरांना होत असल्याचे राज्याचे अतिरिक्त पशुसंवर्धन आयुक्त डॉ. डी. एम. चव्हाण यांनी सूचनापत्रकात स्पष्ट केले आहे. जागतिक पशू आरोग्य संस्थेच्या (वर्ल्ड आॅर्गनायझेशन फॉर अ‍ॅनिमल हेल्थ) यादीत हा रोग नमूद असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बाधित डुकराच्या संपकर् ात आल्यास या रोगाची लागण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानुसार योग्य खबरदारी घेण्याच्या सूचना चव्हाण यांनी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, पशुसंवर्धन अधिकारी, पशुसंवर्धन चिकित्सालय यांना लेखी पत्राद्वारे दिल्या आहेत.  गाव, शहरांमध्ये बाधित डुकरे आढळल्यास त्वरित त्याची उपाययोजना करण्याच्या सूचना पशुसंवर्धन आयुक्तालयामार्फत देण्यात आली आहे. या उपाययोजना करण्यापूर्वी संशयित बाधित डुकरांच्या संपर्कात येताना संबंधितांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असेही पत्रात म्हटले आहे. गाव व शहराच्या पातळीवर डुकरांमध्ये निपाह रोगाची लक्षणे दिसून आल्यास अथवा निपाहसदृश आजारामुळे मृत्युमुखी पडल्यास त्वरित पशुसंवर्धन अधिकारी कार्यालयाने पुणे येथील रोग अन्वेषण विभागाशी संपर्क साधावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.मृत डुकरांचे स्थानिक शवविच्छेदन टाळामृत्युमुखी पडलेल्या डुकरांचे शहर व ग्राम पातळीवर शवविच्छेदन करणे पूर्णपणे टाळावे. मृत्युमुखी डुकरे आढळल्यास रोग अन्वेषण विभागाला त्याची माहिती द्यावी. जेणेकरून योग्य मार्गदर्शक तत्त्वे व खबरदारीच्या सूचनांद्वारे अंमलबजावणी करण्यात येईल. तसेच संशयित निपाहबाधित अथवा निपाहसदृश डुकरांच्या संपकर् ात येण्यापूर्वी पीपीई कीटसह एन-९५ मास्कचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.जिल्हा पशुसंवर्धन कार्यालय सतर्कशहरातील जिल्हा पशुसंवर्धन कार्यालय ‘निपाह’च्या पार्श्वभूमीवर सतर्क झाले आहे. त्यानुसार शहर व परिसरातील डुकरांवर विशेष लक्ष राहणार असून, तसेच कोठे डुकरे मृत्युमुखी व रोगट स्वरुपात आढळल्यास त्वरित अशोकस्तंभ येथील पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक