शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडीसाठी नगर- नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्याचे आदेश

By संजय पाठक | Updated: October 30, 2023 17:31 IST

पंतप्रधानांची पाठ फिरताच घेतला निर्णय, गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शिर्डी दौरा असल्याने त्यावेळी आंदेालने टाळण्यासाठी कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता

नाशिक- यंदा अपुरा पाऊस झाल्याने नाशिककर चिंताक्रांत असतानाच नाशिक जिल्ह्यातील गंगापूर आणि दारणा धरण समुहातून मराठवाड्यातील जायकवाडीसाठी पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे नाशिककरांची चिंता वाढली आहे. यामुळे पाणी प्रश्न पेटण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी राज्यात बहुतांश ठिकाणी अपुरा पाऊस झाला. नाशिक जिल्ह्यात तर सरासरीच्या ६७.८ टक्के पावसाची नोंद झाली आहे. त्यातल्या त्यात धरणे भरली असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असला तरी खरीप पीकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पुढील पावसाळ्यापर्यंत चारा आणि अन्य समस्या निर्माण होणार आहेत. अशा स्थिस्तीत मराठवाड्यासाठी पाणी सोडण्याच्या हालचाली सुरू होणारच होत्या. गेल्या १७ आक्टोबरला छत्रपती संभाजी नगर येथे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाची बैठक पारपडली त्यात केवळ धरणांतील साठ्याची आकडेवारी सादर करण्यात आली होती.

दरम्यान, गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शिर्डी दौरा असल्याने त्यावेळी आंदेालने टाळण्यासाठी कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता मात्र आता यासंदर्भात आदेश जारी करण्यात आला आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरण समुहातून ०.५ टीएमसी, दारणा समुहातून २ हजार ६४३ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्यामुळे हा विषय पेटण्याचीशक्यता आहे.