शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

आजाराने पीडित रुग्णांची सरसकट तपासणीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 19:45 IST

जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागात विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू असून, त्यासाठी हॉटस्पॉट बनलेल्या आठ तालुक्यांत संपर्क अधिकाऱ्यांची नेमणूक यापूर्वीच करण्यात येऊन त्यांच्याकडून दैनंदिन रुग्ण

ठळक मुद्देचार तालुक्यांचा दौरा : कोरोना रोखण्यासाठी उपाययोजना रुग्णांच्या घरी आठवड्यातून दोन वेळा भेट

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता, त्याचा आणखी प्रादुर्भाव रोखण्यासाठी यापुढे वयाच्या चाळिशीनंतर अन्य आजारांनी ग्रस्त असलेल्या सरसकट सर्वच नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला असून, शुक्रवारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चार तालुक्यांचा दौरा करून तशा सूचना दिल्या आहेत. आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांची दर तीन दिवसांनी पुन्हा तपासणी करून त्यावर देखरेख ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. दरम्यान, मनमाड येथे कोरोनामुक्त झालेल्या नऊ व्यक्तींना उपचाराअंति घरी सोडण्यात आले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागात विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू असून, त्यासाठी हॉटस्पॉट बनलेल्या आठ तालुक्यांत संपर्क अधिकाऱ्यांची नेमणूक यापूर्वीच करण्यात येऊन त्यांच्याकडून दैनंदिन रुग्ण व त्यांच्यावरील उपचाराची तसेच प्रतिबंधात्मक उपायोजनांची माहिती घेतली जात आहे. त्या अनुषंगाने शुक्रवारी (दि.१९) जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांनी निफाड, येवला, चांदवड व मनमाड येथे भेट देऊन त्यांनी कोरोनाबाबत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. कोरोना रुग्ण सापडलेल्या कन्टेन्मेंट झोनमधील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याबरोबरच संपूर्ण गावातीलच अन्य आजारांनी ग्रस्त असलेले म्हणजेच उच्च रक्तदाब, मधुमेह, किडनी, कॅन्सर, दमा, टीबी अस्थमा अशा रुग्णांचीही स्वयंस्फूर्तीने घरोघरी जाऊन तपासणी करण्याच्या सूचना बनसोड यांनी दिल्या. अशा रुग्णांच्या घरी आठवड्यातून दोन वेळा भेट देऊन त्यांच्या तापाची तसेच रक्तातील आॅक्सिजनच्या प्रमाणाची तपासणी करून त्यावर देखरेख ठेवण्यात येणार आहे. त्यांच्यातील लक्षणांवर लक्ष ठेवून तत्काळ उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. या संदर्भात प्रत्येक ठिकाणी स्थानिक अधिकाºयांची बैठक घेऊन कोरोना प्रतिबंधात्मक उपायोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या दौºयात अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे, गटविकास अधिकारी उमेश देशमुख, गणेश चौधरी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. नरवणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ससाणे, मनमाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी मेनकर, तहसीलदार कुलकर्णी, केअर सेंटरचे प्रमुख डॉ. जगताप आदी उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद