लोकमत न्युज नेटवर्कवणी : दिंडोरी पंचायत समीतीच्या कामकाजाबाबतच्या अनियमततेबाबत नागरीकाने केलेल्या तक्र ारीस अनुसरु न चौकशी करु न कार्यवाही करण्याचे लेखी पत्र विभागीय आयुक्त कार्यालयाला दिले आहे.याबाबत लेखी पत्रात उलेख असा संदिप अवधुत यांनी दिंडोरी पंचायत समितीत अनियमीतता झाल्याची तक्र ार विभागीय आयुक्त कार्यालयातील मुख्यमंत्री सचिवालय कक्षात केली होती. नागरीकांच्या तक्र ारीचे निराकारण करणेकामी शासनपत्र क्र मांक २०१९/ प्र क्र १०/ ई/ या अन्वये नाशिकरोडच्या विभागीय कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. पाच जिल्ह्यातील कामकाज विभागीय आयुक्त कार्यालयात चालते व तक्र ारीचा निपटारा होणेकामी शासकीय स्तरावर प्रशासकीय व्यवस्थेच्या माध्यमातुन कार्यरत सचिवालय कक्षाने दिंडोरी पंचायत समितीच्या कार्यक्षेत्र व अखत्यारीतील अनियमततेबाबत तक्र ार या ठिकाणी करण्यात आली होती. याबाबत चौकशी करु न कार्यवाही करावी व त्याचा आढावा अहवाल सादर करण्याचे लेखीपत्र मुख्यमंत्री सचिवालय कक्ष व विशेष कार्यकारी अधिकारी उपायुक्त स्वामी यांनी दिले आहे. तसेच याबाबत तक्र ारदार यांना आढावा अहवाल प्रत देण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.
अधिकारी-कर्मचारी विरोधातील तक्र रीबाबत महसुल उपायुक्तांचे कार्यवाही करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 14:53 IST
वणी : दिंडोरी पंचायत समीतीच्या कामकाजाबाबतच्या अनियमततेबाबत नागरीकाने केलेल्या तक्र ारीस अनुसरु न चौकशी करु न कार्यवाही करण्याचे लेखी पत्र विभागीय आयुक्त कार्यालयाला दिले आहे.
अधिकारी-कर्मचारी विरोधातील तक्र रीबाबत महसुल उपायुक्तांचे कार्यवाही करण्याचे आदेश
ठळक मुद्दे याबाबत तक्र ारदार यांना आढावा अहवाल प्रत देण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.