शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
5
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
6
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
7
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
8
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
9
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
10
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
11
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
12
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
13
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
14
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
15
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
16
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
17
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
18
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
19
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
20
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल

कारवाई सुरू करण्याचे आदेश : पुन्हा चालणार बुलडोझर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 01:11 IST

पूररेषेतील बांधकामे हटविण्याची घोषणा महापालिकेने केल्यानंतर काही मंगल कार्यालयांनी स्वत:हून बांधकामे हटविली तर काही महापालिकेने हटविली, परंतु त्यानंतर एका प्रकरणात पालिकेला न्यायालयात तोंडघशी पडावे लागले. त्यातच आयुक्त रजेवर गेल्यानंतर साडेतीन हजार बांधकामांवर बुलडोझर फिरवण्याचा मनसुबा बाळगणाऱ्या प्रशासनाने कारवाई स्थगित ठेवली होती,

नाशिक : पूररेषेतील बांधकामे हटविण्याची घोषणा महापालिकेने केल्यानंतर काही मंगल कार्यालयांनी स्वत:हून बांधकामे हटविली तर काही महापालिकेने हटविली, परंतु त्यानंतर एका प्रकरणात पालिकेला न्यायालयात तोंडघशी पडावे लागले. त्यातच आयुक्त रजेवर गेल्यानंतर साडेतीन हजार बांधकामांवर बुलडोझर फिरवण्याचा मनसुबा बाळगणाऱ्या प्रशासनाने कारवाई स्थगित ठेवली होती, मात्र प्रभारी आयुक्त राधाकृष्णन यांनी सायंकाळी कारवाई सुरू करण्याचे आदेश दिल्याने लवकरच बुलडोझर चालविण्याची तयारी सुरू झाली आहे.  महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बेकायदेशीर कामांवर कारवाईचा बडगा उगारला आणि पुढे सर्वच ठिकाणी त्यांनी हेच अभियान राबविले. त्यानुसारच त्यांनी शहरातील पूररेषतील बेकायदेशीर बांधकामे हटविण्याचा निर्णय जाहीर केला होता. पूररेषेत सुमारे साडेतीन हजार बांधकामे असून, त्यावर बुलडोझर चालविण्याची तयारी करण्यात आली होती. आयुक्त मुंढे यांच्या घोषणेनंतर त्यांनी प्रत्यक्ष कारवाई करण्याच्या आधीच विश्वास लॉन्सच्या संचालकांनी स्वत:हून अतिक्रमण हटवले, परंतु त्यानंतरही महापालिकेने काही प्रमाणात येथील बांधकाम हटविले, त्याचबरोबर आसारामबापू आश्रमावरही हातोडा चालविला. यामुळे बेकायदेशीर बांधकामे करणाºयांचे धाबे दणाणले. मात्र, ही कारवाई सुरू असताना ग्रीन फिल्डच्या  अतिक्रमणातून महापालिकेला चांगलेच अडचणीत आणले. महापालिकेला या प्रकरणात मानहानी सहन करावी लागल्यानंतर आता या प्रकरणात प्रशासनाने जरा सबुरीने घेतले आहे.  गोदावरी नदीच्या शुद्धीकरणाबाबत उच्च न्यायालयात दाखल याचिकेदरम्यान पूररेषेतील अतिक्रमणे हटविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पूररेषेच्या अंतर्गत जवळपास साडेतीन हजार अतिक्र मणे आहेत. यातील पूररेषेतील अनेक इमारतींमधील सदनिका ग्राहकांना विकण्यात आल्या आहेत. मात्र, त्यांना पूर्णत्वाचा दाखला मिळालेला नसल्याने संबंधितांचा जीव टांगणीला लागला आहे तर गावठाणात तर ही संख्या हजारोच्या संख्येने आहे. गावठाणात नव्याने बांधकाम करताना स्टील्ट बांधकाम केल्यास बांधकाम पूर्णत्वाचे दाखले देण्याचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे गावठाणातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.  परंतु गावठाण क्षेत्र वगळता पूररेषेत असलेली जवळपास साडेतीन अनधिकृत बांधकामे पालिकेच्या रडावर आहेत. ग्रीन फिल्ड प्रकरणानंतर पूररेषेतील बांधकामे पाडताना पुन्हा अडचणी येऊ नये म्हणून महापालिकेकडून पुरेसा अभ्यास करूनच कारवाई करण्याची तयारी सुरू आहे. परंतु प्रभारी आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी मात्र उच्च न्यायालयाचे आदेश असल्याने पूररेषेतील बांधकामांवर कारवाई होणारच असल्याचा दावा केला आहे. पूररेषेतील अतिक्र मणे पाडणारच असे सांगत, अतिक्र मण विभागाला यासंदर्भात आदेश दिल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या बांधकामांना अभय मिळाल्याची चर्चा आता अफवाच ठरणार आहे.पोलीस बंदोबस्ताचा प्रश्न सोडवणारसध्या महापालिका आणि पोलीस आयुक्तालय यांच्यात समन्वय नसून बंदोबस्त पुरवण्यावरून संघर्ष सुरू आहे. पोलीस यंत्रणेकडून बंदोबस्त देण्यास टाळाटाळ सुरू आहे. बंदोबस्तापोटी महापालिकेने थकीत रक्कम भरावी भरा, मग बंदोबस्त देऊ, अशी भूमिका पोलीस खात्याने घेतली आहे. तर पालिका आयुक्तांनी त्यांना कायद्यानुसार मदत मागितल्याचे सांगितले जाते. त्यामुळे पोलीस बंदोबस्ताची अडचण असली तरी चर्चेतून लवकरच बंदोबस्ताचा विषय मार्गी लावला जाणार असल्याचे प्रभारी आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका