शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दलितवस्तीसाठी जनगणनेनुसार बृहत आराखडे पाठविण्याचे आदेश

By admin | Updated: May 27, 2014 01:10 IST

समाजकल्याण समिती बैठकीतील निर्णय

समाजकल्याण समिती बैठकीतील निर्णयनाशिक : चालू आर्थिक वर्षात राबविण्यात येणार्‍या योजनांपैकी दलित वस्ती योजनेची कामे करताना सन २०११ च्या जनगणनेनुसार बृहत आराखडे ३१ मे २०१४ अखेरपर्यंत जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण कार्यालयाकडे पाठवावेत, असे आदेश सभापती राजेश नवाळे यांनी दिले.समाजकल्याण समितीची मासिक बैठक राजेश नवाळे यांच्या उपस्थितीत झाली. बैठकीत २०१४-१५ या आर्थिक वर्षामध्ये राबविण्यात येणार्‍या योजनांचा सविस्तर आढावा राजेश नवाळे यांनी घेतला. तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तींचा विकास करणे ही योजना यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सर्व उपस्थित पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यांना ग्रामपंचायतीचे दलित वस्ती असलेल्या सन २०११ च्या जनगणनेनुसारच बृहत आराखडे ३१ मे २०१४ अखेर जिल्हा समाजकल्याण कार्यालयाकडे पाठविण्याच्या सूचना सभापती राजेश नवाळे यांनी दिल्या. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत स्तरावरील १५ टक्के मागासवर्गीयांकरिता खर्च व पंचायत समिती स्तरासाठी २० टक्के सेस यासंदर्भात वेळोवेळी बैठकीत माहिती सादर करण्याचे विस्तार अधिकारी (स.क.) यांना सूचित करण्यात आले. समाजकल्याण विभागातर्फे आचारसंहितेच्या काळात समाजकल्याण विभागाच्या शिल्लक असलेल्या साहित्याचे त्वरित वाटप करण्यात यावे, अशा सूचनाही नवाळे यांनी दिल्या. या बैठकीस सदस्य सुभाष गांगुर्डे, बंडू गांगुर्डे, साईनाथ मोरे, शीतल कडाळे, निर्मला गिते, अर्जुन मेंगाळ, शिवांगी पवार, कुसुम अहिरे, स्वाती ठाकरे, इंदूबाई गवळी आदि उपस्थित होते.(प्रतिनिधी)