शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

बालकांच्या कोविडसाठी आधीच औषधांची मागणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 02:17 IST

कोराेनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची तयारी करताना अगोदरचा अनुभव लक्षात घेता बालकांवर उपचारासाठी लागणारी औषधे आणि इंजेक्शन नंतरच्या काळात अपुरी पडू नये यासाठी आताच मागणी नोंदवावी तसेच व्हेंटिलटरदेखील तातडीने खरेदी करून संभाव्य धोका टाळावा, अशी सूचना बालरेाग तज्ज्ञ आणि अन्य वैद्यकीय व्यावसायिकांनी महापौर सतीश कुलकर्णी यांच्याकडे केली आहे तर बाल रुग्णालयांना कोविड उपचारासाठी लागणारे साहित्य तसेच परवानगी देताना सहकार्य केले जाईल, त्याचबरोबर आता तातडीने हेल्पलाईन सुरू करण्यात येईल, अशी घोषणा महापौरांनी केली आहे. 

ठळक मुद्देबालरोग तज्ज्ञांची मागणी : महापौरांनी घेतली पूर्वतयारी बैठक

नाशिक : कोराेनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची तयारी करताना अगोदरचा अनुभव लक्षात घेता बालकांवर उपचारासाठी लागणारी औषधे आणि इंजेक्शन नंतरच्या काळात अपुरी पडू नये यासाठी आताच मागणी नोंदवावी तसेच व्हेंटिलटरदेखील तातडीने खरेदी करून संभाव्य धोका टाळावा, अशी सूचना बालरेाग तज्ज्ञ आणि अन्य वैद्यकीय व्यावसायिकांनी महापौर सतीश कुलकर्णी यांच्याकडे केली आहे तर बाल रुग्णालयांना कोविड उपचारासाठी लागणारे साहित्य तसेच परवानगी देताना सहकार्य केले जाईल, त्याचबरोबर आता तातडीने हेल्पलाईन सुरू करण्यात येईल, अशी घोषणा महापौरांनी केली आहे. महापौर सतीश कुलकर्णी यांनी शहरातील बालरोग तज्ज्ञांची बैठक घेतली. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रविष्ट आष्टीकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे, डॉ. कल्पना कुटे, आयएमए नाशिकचे अध्यक्ष डॉ. हेमंत सोननीस, बालरोगतज्ज्ञांच्या संघटनेचे अध्यक्ष डॉ. रवींद्र सोनवणे आदी उपस्थित होते.पालक, प्रौढ नागरिक आणि शिक्षक यांचे लसीकरण तातडीने पूर्ण करावे, दुसरी बाब म्हणजे बालकांच्या कोविडवरील उपचारासाठी लागणारी औषधे आणि व्हेंटिलेटर्सची आताच मागणी नोंदवून ठेवावी तसेच पुरेशा ऑक्सिजनची सोय करावी जेणेकरून ऐनवेळी संकट येणार नाही तसेच औषधांची टंचाई होणार नाही त्याचप्रमाणे आधी यासंदर्भात जनजागृती करावी अशाप्रकारची मागणी व्यवसायिकांनी केली. या बैठकीस आयएमएच्या सेक्रेटरी कविता गाडेकर, बालरोगतज्ज्ञ संघटनेच्या सेक्रेटरी डॉ. रिना राठी, डॉ. रमाकांत पाटील, डॉ. मिलिंद भराडिया, डॉ. सागर सोनवणे, डॉ. संजय आहेर, डॉ. नितीन सुराणा, डॉ. श्रेयस गायधनी डॉ. अमोल कुलकर्णी, डॉ. नवीन बाजी, डॉ. शलाका बागुल, डॉ. ललित बागुल, डॉ. विनोद पावस्कर आदी उपस्थित होते.हेल्पलाइन करणारnमहापौर सतीश कुलकर्णी यांनी महापालिकेकडून पुरेशा औषध साठ्याची व्यवस्था करताना कोरोना  कसा टाळता येईल तसेच भीतीचे वातावरण घालवण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. कोरोनाबाधितांवर उपचार करताना कोविड आणि नॉन कोविड असे दोन भाग करावेत, असे त्यानुसार नियोजन करावे, असे सांगितले तर डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी  बालकांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय सेवकांना प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचे सांगितले. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी वैद्यकीय व्यवसायिकांनी त्रिसूत्री मांडली. 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या