शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

पतसंस्थेच्या कार्यालयाबाबत चौकशी करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 00:46 IST

जिल्हा शासकीय रुग्णालयात असलेल्या जिल्हा रुग्णालय सहकारी कर्मचारी पतसंस्थेचे कार्यालय अनधिकृत असल्याच्या तक्रारीनंतर या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत़

नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयात असलेल्या जिल्हा रुग्णालय सहकारी कर्मचारी पतसंस्थेचे कार्यालय अनधिकृत असल्याच्या तक्रारीनंतर या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत़जिल्हा रुग्णालय सहकारी कर्मचाºयांची पतसंस्था गेली ३० वर्षांपासून कार्यरत आहे. मात्र या पतसंस्थेचे कार्यालय हे रुग्णालयाच्या शासकीय इमारतीत आहे. हे कार्यालय बेकायदेशीर असल्याची तक्रार एका कर्मचाºयाने जिल्हा शल्यचिकित्सकांना तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाला केली आहे. यामध्ये म्हटले आहे की, तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सकांनी या कार्यालयाला जागा देण्याचे मान्य केले होते. मात्र प्रत्यक्ष जागा दिली नव्हती. परंतु संस्थेच्या पदाधिकाºयांनी जिल्हा रुग्णालय कार्यालयातच पतसंस्थेचे कार्यालय सुरू केले. ते आजपर्यंत बेकायदेशीरपणे सुरू आहे. या पतसंस्थेकडून रुग्णालयास कसलेही भाडे अगर काहीही उत्पन्न मिळत नाही. उलट या कार्यालयासाठी वीज, पाणी यांसह विविध सुविधा फुकट दिल्या जात आहेत. शासकीय नियमानुसार कोणत्याही खासगी आस्थापनांचे कार्यालय शासकीय जागेत तसेच शासकीय इमारतीत सुरू करता येत नाही. परंतु या पतसंस्थेचे कार्यालय शासकीय इमारतीत कार्यरत आहे. याबाबत कुठलेही अधिकृत कागदपत्र पतसंस्थेकडे नाहीत.मार्च २००८ च्या शासन निर्णयनुसार कोणत्याही व्यक्ती, संस्था, सहकारी संस्था, संघटना यांचे कार्यालयासाठी व व्यवसायासाठी शासकीय जागेचा वापर करता येणार नाही. या निकषात पतसंस्था असल्याने मागील ३० वर्षांचे भाडे पतसंस्थेच्या संचालकांकडून वसूल करण्यात यावे तसेच जिल्हा रुग्णालय प्रशासनाने यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी कर्मचारी उज्ज्वला कराड यांनी निवेदनाद्वारे केली आहे.जिल्हा रुग्णालय सहकारी कर्मचारी पतसंस्था कार्यालय अनधिकृतपणे जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीत असल्याची तक्रार आपणास मिळाली आहे. त्यानुसार या सर्व प्रकाराची कडक चौकशी करून योग्य ती कारवाईचे करण्याचे आदेश आपण रुग्णालय प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार चौकशी सुरू आहे.  - डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा शल्यचिकित्सक

टॅग्स :Nashikनाशिकhospitalहॉस्पिटल