लासलगाव : निफाड येथील दिवाणी न्यायालयात मुळा सहकारी साखर कारखान्याने रानवड येथील कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखान्याविरु ध्द दाखल केलेल्या वसुली प्रकरणात न्यायालयाने काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखान्याची (रासाका) मालमत्ता जप्त करण्याचे आदेश बुधवारी (दि.११) दिले आहेत.निफाड येथील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात नेवासा तालुक्यातील सोनाई येथील मुळा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने १ कोटी ७३ लाख ९ हजार ११७ रु पये वसुली संदर्भात रानवड येथील कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखाना व अवसायक यांचेविरु ध्द दावा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणात मुळा साखर कारखान्याच्या वतीने कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखान्याच्या मालकीची नांदुर्डी येथील मालमत्ता गट क्र मांक ३२५ मधील क्षेत्र २ हेक्टर ८१ आर आणि गट क्र मांक ३२७ मधील क्षेत्र ९ हेक्टर ५ आर अशी एकूण ११ हेक्टर ८६ आर इतकी मालमत्ता जप्त करण्याबाबत मागणी करण्यात आली होती. त्याबाबत कर्मवीर काकासाहेब वाघ साखर कारखान्याने आपले म्हणणे सादर केले नाही. त्यामुळे निफाडचे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश एस. बी. काळे यांनी दिवाणी प्रक्रि या संहिता नियम ५४ आदेश २१ नुसार मालमत्ता जप्त करण्यासंबंधी वॉरंट बजावण्याचा आदेश दिला आहे.
रानवड साखर कारखाना मालमत्ता जप्तीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 18:57 IST
वसुलीचा दावा : निफाड दिवाणी न्यायालयात प्रकरण
रानवड साखर कारखाना मालमत्ता जप्तीचे आदेश
ठळक मुद्दे१ कोटी ७३ लाख ९ हजार ११७ रु पये वसुली संदर्भात रानवड येथील कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखाना व अवसायक यांचेविरु ध्द दावा