शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 23:53 IST

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील शिक्षकांचे निवड वेतनश्रेणी व चटोपाध्याय वेतनश्रेणी प्रस्ताव सर्व शिक्षकांनी पूर्तता करून दिलेले असतानाही इगतपुरी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या हलगर्जीपणामुळे तालुक्यातील शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी व चटोपाध्याय वेतनश्रेणीपासून वंचित राहावे लागले आहे.

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील शिक्षकांचे निवड वेतनश्रेणी व चटोपाध्याय वेतनश्रेणी प्रस्ताव सर्व शिक्षकांनी पूर्तता करून दिलेले असतानाही इगतपुरी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या हलगर्जीपणामुळे तालुक्यातील शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी व चटोपाध्याय वेतनश्रेणीपासून वंचित राहावे लागले आहे.नाशिक जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील शिक्षकांचे चटोपाध्याय व वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव मंजूर केले असून, इगतपुरी तालुक्याचे प्रस्तावच पंचायत समिती स्तरावरून जिल्हा परिषदेला न पाठवल्यामुळे इगतपुरी तालुक्याचे प्रस्ताव मंजूर होऊ शकले नाही.सदर प्रस्ताव जिल्हास्तरावर सादर करण्याबाबत इगतपुरी तालुका शिक्षक संघाच्या वतीने वारंवार निवेदन देऊनही तालुका शिक्षण विभागाने त्याकडे साफ दुर्लक्ष केल्याने प्रस्ताव मंजूर होऊ शकले नाही. त्यामुळे इगतपुरी तालुका शिक्षक संघाच्या वतीने गांधीगिरी आंदोलन करत शिक्षण विभागाला गुलाबपुष्प आणि अभिनंदन पत्र देऊन उपहासात्मक सत्कार करण्यात आला. गटविकास अधिकारी किरण जाधव यांनी शिक्षण विभागाबद्दल नाराजी व्यक्त करून यास जबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला व आजच सर्व प्रस्ताव जिल्हा परिषदेला तातडीने पाठविण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिले.इगतपुरी तालुक्याचे नेते उमेश बैरागी, तालुकाध्यक्ष निवृत्ती नाठे, दीपक भदाणे, सुनील शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.----------------------------------शासकीय सेवेत असलेल्या सर्व कर्मचाºयांना पदोन्नतीनुसार वेगवेगळ्या प्रकारची वेतन श्रेणी लागू असते. जिल्हा परिषद अंतर्गत काम करणाºया प्राथमिक शिक्षकाना सेवेत बारा वर्षे पूर्ण झाल्यानंतर वरिष्ठ वेतन श्रेणी लागू होते २००६ : २००७ यावर्षी सेवेत लागलेल्या शिक्षकांचे वरिष्ठ वेतन श्रेणीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या लाल फितीत अडकले होते. शिक्षक संघटनानी अनेक वेळा यासंदर्भात आवाज उठवूनदेखील प्रशासकीय यंत्रणा या संदर्भात दाद देत नव्हती. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी प्रश्न हाती घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोडे आणि शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांना याबाबत कळवून पडून असलेले प्रस्ताव मंजूर करण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिक