शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
4
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
5
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
6
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
7
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
8
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
9
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
10
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
11
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
12
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
13
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
14
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
15
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
16
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
17
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
18
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
19
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
20
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?

नाशिकला बेमोसमी पावसाचा रविवारी ‘ऑरेंज अलर्ट‘; गडगडाटी पावसासह गारपिटीचा इशारा

By अझहर शेख | Updated: November 25, 2023 17:00 IST

नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

अझहर शेख, नाशिक : वातावरणात अचानकपणे झालेल्या बदलामुळे उत्तर मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्याला जोरदार बेमोसमी वादळी गडगडाटी पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यासाठी रविवारी (दि.२५) कुलाबा वेधशाळेकडून ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. जिल्ह्यातील काही भागात अवकाळी वादळी गडगडाटी पाऊस विजांच्या कडकडाटासह होऊ शकतो, असे हवामान खात्याने म्हटले आहे. यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

अरबी समुद्रापासून तर मालदीव अन् उत्तर महाराष्ट्रापर्यंत पश्चिम किनारपट्टीत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने बेमोसमी पाऊस मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात होऊ शकतो. तसेच वादळवाऱ्यासह विजांचा कडकडाट व गारपिटीचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे. शुक्रवार व शनिवारी (दि.२५) नाशिकसाठी ‘यलो अलर्ट’ देण्यात आला होता. रविवारी ऑरेंज अलर्ट दर्शविण्यात आला आहे. यामुळे नाशिक शहरासह जिल्ह्यातील काही तालुक्यांत जोरदार पाऊस होऊ शकतो. सोसाट्याचा वारा किमान ४० ते ५० ताशी वेगाने वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सोमवारी नाशिकसाठी ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. वातावरणात बदल झाल्यास हा अलर्टदेखील बदलू शकतो, असे हवामान खात्याने म्हटले आहे.हवामान विभागाने नागरिकांना पावसाच्या पार्श्वभूमीवर सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.गडगडाट व विजांचा कडकडाट होत असताना नागरिकांनी झाडाखाली किंवा उघड्यावर थांबू नये, विजा कोसळून हानी होण्याची शक्यता असते, यामुळे पशुधनदेखील सुरक्षित ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नाशिकसह अहमदनगर, नंदुरबार, धुळे जिल्ह्यांतही बेमोसमी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

शनिवारी ढगाळ हवामान

शहरात शनिवारी सकाळपासून ढगाळ हवामान पहावयास मिळाले. नाशिककरांना सूर्यदर्शन उशिराने घडले. दहा वाजेच्या सुमारास कोवळी सूर्यकिरणे पडल्याचा अनुभव नागरिकांनी घेतला. दुपारीही उन्हाची तीव्रता फारशी जाणवत नव्हती; मात्र वातावरणात दमटपणा तयार झाल्याने नागरिकांना दिवसभर उकाडा जाणवला.

टॅग्स :Rainपाऊस