शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी येऊन जाताच...! चुराचांदपूरमध्ये पुन्हा हिंसा भडकली, कुकी नेत्यांची घरे जाळली
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
4
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
5
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
6
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
7
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
8
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
9
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
10
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
11
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
12
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
13
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
14
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
15
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
16
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
17
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका
18
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
19
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
20
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 

मौखिक आरोग्य तपासणीत नाशिक जिल्हा प्रथम ३१ पर्यंत मोहीम : ५,१५,३३९ नागरिकांची तापसणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 00:54 IST

मौखिक आरोग्य तपासणी मोहिमेअंतर्गत नाशिक जिल्ह्णात आतापर्यंत ५ लाख १५ हजार ३३९ नागरिकांची तापसणी करण्यात आली

ठळक मुद्दे४ लाख ७० हजार ५४२ नागरिकांनी स्वत:हून तपासणीउपचारासाठी नजीकच्या दवाखान्यात

नाशिक : मौखिक आरोग्य तपासणी मोहिमेअंतर्गत नाशिक जिल्ह्णात आतापर्यंत ५ लाख १५ हजार ३३९ नागरिकांची तापसणी करण्यात आली असून, या मोहिमेत नाशिक जिल्हा प्रथम क्रमांकावर असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी सुशील वाकचौरे यांनी दिली.डिसेंबर महिन्याच्या पहिल्या दिवसापासून या मोहिमेला सुरुवात झाली असून, ३१ डिसेंबरपर्यंत ही तपासणी मोहीम राज्यभर सुरू राहणार आहे.नाशित जिल्ह्णात आतापर्यंत विविध तपासणी केंद्रावर ४ लाख ७० हजार ५४२ नागरिकांनी स्वत:हून ही तपासणी करून घेतली असून, सुमारे ४४ हजार ७९७ नागरिकांना आरोग्य विभागाचे कर्मचारी व स्वयंसेवी संस्थांनी या तपासणीचे महत्त्व पटवून देत त्यांची मौखिक तपासणी करवून घेतली आहे.राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या या मौखिक तपासणी मोहिमेअंतर्गत संपूर्ण राज्यात ३० वर्षांवरील स्त्री व पुरु षांची मौखिक तपासणी केली जात असून, ही तपासणी सर्व शासकीय, महापालिका, नगरपालिका दवाखाने येथे मोफत उपलब्ध आहे. तसेच गाव पातळीवरही तपासणी एएनएम व एमपीडब्लू यांच्यामार्फत करून गरजू लोकांना पुढील उपचारासाठी नजीकच्या दवाखान्यात पाठविण्यात येणार आहे. यामध्ये उपचार हे पूर्णत: निशुल्क असणार आहेत. ही मोहीम यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी इंडियन डेंटल असोसिएशन, इंडियन मेडिकल असोसिएशन, इंडियन कॅन्सर सोसायटी, लायन्स, रोटरी क्लब तसेच शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालयांसारख्या विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्यातून राज्यभरात ही मोहीम सुरू आहे.या मोहिमेदरम्यान संदर्भित झालेल्या रु ग्णांना पुढील सहा महिन्यांच्या आत अंतिम निदान व उपचार करण्यात येणार आहे. या मोहिमेत नागरिकांनी सहभागी होऊन मौखिक तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्यमंत्री डॉ. वाक चौरे यांनी केले आहे.