शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

करवाढीच्या विरोधात विरोधकांची वज्रमूठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 00:49 IST

नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विशेषाधिकारात लागू केलेले वार्षिक भाडेमूल्य आणि खुल्या भूखंडावरील कर आकारणीच्या विरोधात सत्तारूढ भाजपाला महासभेत घेरण्याची तयारी विरोधकांनी सुरू केली असून, सोमवारी (दि. १६) विरोधी पक्षांच्या गटनेत्यांची बैठक होणार आहे. त्यात करवाढ रोखण्यासाठी एकत्रित लढा देण्यात येणार आहेत. भाजपातील ज्या नगरसेवकांना करवाढ नको आहे, अशांनादेखील या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन विरोधी पक्ष नेते अजय बोरस्ते यांनी केले आहे.

ठळक मुद्देरणनीतीसाठी बैठक भाजपाला आवाहन

नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विशेषाधिकारात लागू केलेले वार्षिक भाडेमूल्य आणि खुल्या भूखंडावरील कर आकारणीच्या विरोधात सत्तारूढ भाजपाला महासभेत घेरण्याची तयारी विरोधकांनी सुरू केली असून, सोमवारी (दि. १६) विरोधी पक्षांच्या गटनेत्यांची बैठक होणार आहे. त्यात करवाढ रोखण्यासाठी एकत्रित लढा देण्यात येणार आहेत. भाजपातील ज्या नगरसेवकांना करवाढ नको आहे, अशांनादेखील या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन विरोधी पक्ष नेते अजय बोरस्ते यांनी केले आहे.महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मार्च महिन्यात करवाढ केल्यानंतर त्याच्या विरोधात बैठका, मेळावे सुरू झाले होते. हा विरोध शमविण्यासाठी भाजपाने तातडीने महासभा घेतली असली तरी विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने त्यावर निर्णय घेता आला नव्हता. उलट आयुक्तांनी करवाढ घोषित करताना आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार जिल्हा प्रशासनाकडे करण्याचा ठराव केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी महापौरांना दरडाविल्याने तसे धाडसही महापालिकेने केले नव्हते. दरम्यान, आता आचारसंहिता संपल्यानंतर तहकूब महासभा येत्या १९ जुलैस होणार असून, त्यात आधी करवाढीवर निर्णय द्या, असा आग्रह धरत कामकाज रोखण्याचा इशारा विरोधी पक्षांनी दिला आहे. यासंदर्भात विरोधी गटांची बैठक सोमवारी (दि. १६) होणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी दिली. या बैठकीत महासभेची रणनीती ठरणार आहे.सभा गुंडाळली तर....१९ जुलै रोजी प्रथम स्थगित महासभाच होणार असून, जोपर्यंत त्यात करवाढ रद्दचा निर्णय होत नाही तोपर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत सभा चालली तरी ती चालविण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. गोंधळाचे निमित्त करून महापौरांनी सभा गुंडाळलीच तर यापुढे सभाच होऊ दिली जाणार नाही, असा निर्णय बैठकीत घेतला जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका