नाशिक : भारतीय जनता पार्टी विद्यार्थी आघाडी नाशिक महानगरच्या वतीने स्टेट बॅँक आॅफ इंडिया मुख्य शाखेचे सहायक महाप्रबंधक किशोर निकुंभ यांना, बॅँकेत खाते उघडण्यासाठी पॅनकार्डची सक्ती करू नये यासाठी निवेदन देण्यात आले. यावेळी भाजपाचे पदाधिकारी व सहायक महाप्रबंधक यांच्यात सकारात्मक चर्चा होऊन पॅनकार्ड नसल्यास पॅनकार्डचा नोंदणी अर्ज ग्राह्य धरण्याचे व ६० नंबरचा अर्ज भरून देण्याचा अर्ज उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील सर्व बॅँकांना तशा प्रकारच्या सूचना तातडीने देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले. कोणताही विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही. कोणत्याही विद्यार्थ्याला खाते उघडण्याबाबत अडचण आल्यास त्यांनी थेट संपर्कसाधावा, असे आवाहन निकुंभ यांनी केले. याप्रसंगी अमित घुगे, अमोल पाटील, ऋषिकेश अहेर, निखिलेश गांगुर्डे, दिनेश अहिरे, सागर परदेशी, भगवान बरके, विपुल सुराणा आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
बँक खाते उघडताना पॅनकार्ड सक्तीला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 00:29 IST