शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेच्या थंडपणावर पक्षश्रेष्ठींची नाराजी

By admin | Updated: June 11, 2017 01:02 IST

जिल्ह्यातील सेना नेतृत्व अपयशी ठरल्याचा अप्रत्यक्ष ठपका खासदार संजय राऊत यांनी ठेवल्याने सेनेंतर्गत नेतृत्व बदलाच्या चर्चेने जोर धरला आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : राज्यव्यापी शेतकरी संपाचा केंद्रबिंदू नाशिक जिल्हा असतानाही या शेतकऱ्यांच्या या आंदोलनाचा राजकीय फायदा करून घेण्यात जिल्ह्यातील सेना नेतृत्व अपयशी ठरल्याचा अप्रत्यक्ष ठपका खासदार संजय राऊत यांनी ठेवल्याने सेनेंतर्गत नेतृत्व बदलाच्या चर्चेने जोर धरला आहे. त्यामुळेच येत्या महिन्यात पक्ष संघटनेला त्यांच्यातील आक्रमकपणा दाखवून देण्याचे आवाहन राऊत यांना करावे लागले आहे.१ जूनपासून शेतकऱ्यांनी संप पुकारल्यानंतर या संपाला सर्वच राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला असला तरी, यापूर्वी सत्तेवर असलेल्या कॉँग्रेस व राष्ट्रवादीने कुंपणावर उभे राहूनच शेतकरी आंदोलनाला मदत केली तर सत्तेत सहभागी असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उघडपणे शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहून पुरेपूर राजकीय फायदा पदरात पाडून घेतला. एवढेच नव्हे तर या संपाचे नेतृत्वही त्यांच्याकडे आपसूकच चालून आले. त्यामानाने शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी या संपूर्ण आंदोलनादरम्यान आस्तेकदम टाकले, विशेष म्हणजे राज्यव्यापी बंदमध्येदेखील शिवसेनेचा जेमतेम सहभाग राहिल्यामुळे या बंदलाही पाठिंबा मिळू शकला नाही. पदाधिकाऱ्यांची निष्क्रियतापूर्वी सेनेचा बंद म्हटला की, व्यावसायिकांना दुकाने बंद करण्याचे आवाहन करण्याची गरज नव्हती; परंतु परवा मात्र सेनेच्या नेत्यांना रस्त्यावर उतरून काही ठरावीक भागापुरती दुकाने बंद करावी लागली. त्यामुळे हाती आलेली चांगली संधी घालविल्याची सल सेनेच्या पक्षश्रेष्ठींनी बोलून दाखविली आहे. शेतकरी कर्जमुक्तीबाबत नाशिकमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारविरोधात एल्गार पुकारला त्याच नाशिकमध्ये शेतकरी संपाबाबत राज्यव्यापी परिषद घेतली जाते व सेनेच्या नेतृत्वाला साधी विचारणाही केली गेली नसल्याची बाब पक्षाला चांगलीच खटकली. या साऱ्या गोष्टीस सेनेचे जिल्हा व महानगरप्रमुखच जबाबदार असल्याचा निष्कर्ष पक्षाने काढला असावा त्यामुळेच अशा निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना बदलण्याचा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिल्याची चर्चा आता पक्षात होऊ लागली आहे.