शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

एचएएल कामगार संघटनेच्या ऑनलाइन निवडणुकीस विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2021 20:15 IST

ओझरटाऊनशिप : येथील एच.ए.एल. कामगार संघटनेची त्रैवार्षिक निवडणूक ऑनलाइन घेण्याच्या व्यवस्थापनाने कामगार संघटनेसमोर ठेवलेल्या पर्यायास श्रीविश्वास ग्रुपचा विरोध असून, ऑनलाइन निवडणूक प्रक्रियेत खूप साऱ्या त्रुटी असल्याने कामगार संघटनेची निवडणूक सिक्रेट बॅलेट पेपरद्वारेच घेण्यात यावी, अशी मागणी कामगार संघटनेचे विरोधी गटाचे सहचिटणीस व श्रीविश्वास ग्रुपचे प्रमुुख गिरीश वलवे यांनी संघटनेचे सरचिटणीस सचिन ढोमसे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

ठळक मुद्देप्रणालीत त्रुटी : विरोधी गटाने घेतला आक्षेप, संघटनेला दिले निवेदन

ओझरटाऊनशिप : येथील एच.ए.एल. कामगार संघटनेची त्रैवार्षिक निवडणूक ऑनलाइन घेण्याच्या व्यवस्थापनाने कामगार संघटनेसमोर ठेवलेल्या पर्यायास श्रीविश्वास ग्रुपचा विरोध असून, ऑनलाइन निवडणूक प्रक्रियेत खूप साऱ्या त्रुटी असल्याने कामगार संघटनेची निवडणूक सिक्रेट बॅलेट पेपरद्वारेच घेण्यात यावी, अशी मागणी कामगार संघटनेचे विरोधी गटाचे सहचिटणीस व श्रीविश्वास ग्रुपचे प्रमुुख गिरीश वलवे यांनी संघटनेचे सरचिटणीस सचिन ढोमसे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, कामगार संघटनेची प्रलंबित निवडणूक तातडीने घेण्यास आजी माजी पदाधिकाऱ्यांनी संमती दिलेली आहे; पण कामगार संघटनेच्या नियमावलीनुसार निवडणूक ही गुप्त मतदान पद्धतीने होणे अपेक्षित आहे. तशी संघटनेची नियमावली आहे. तरीसुद्धा व्यवस्थापनाने ऑनलाइन निवडणुकीचा पर्याय कामगार संघटनेसमोर ठेवत संघटनेचे आजी माजी पदाधिकारी व सर्व गटाचे कार्यकर्ते यांना ऑनलाइन निवडणूक डेमो दाखविला; परंतु ऑनलाइन निवडणूकप्रणालीत बऱ्याच त्रुटी आहेत. या सगळ्या त्रुटींची पूर्तता झाल्याशिवाय निवडणूक होऊ शकणार नाही, कॉम्प्युटर स्क्रीन ही प्रत्येक पदासाठी आणि निशाणी चिन्हांसहित अंकित नाही, कॉम्प्युटर स्क्रीन ही कुठल्याही पासवर्डविरहित नसल्याने कामगारांच्या मतदानाविषयी गुप्तता पाळता येत नाही, मतदान केल्यानंतर त्यांची प्रिंट निघून मतपेटीत टाकण्याची सुविधा त्यात नाही, फेरमतमोजणी करायची सुविधा नाही, यासह बऱ्याच त्रुटी या प्रक्रियेत आहेत.१५ दिवसांपूर्वीच एचएएल हैदराबाद डिव्हिजनच्या कामगार संघटनेची निवडणूक आणि नाशिकच्या इंडिया सिक्युरिटी प्रेसची निवडणूक सिक्रेट बॅलेट पद्धतीने घेण्यात आली आहे. त्यामुळे मतपत्रिकेद्वारेच कामगार संघटनेची निवडणूक व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. संघटनेतील विरोधी गटाचे सहचिटणीस गिरीश वलवे, पवन आहेर, योगेश आहिरे, सचिन धोंडगे, कैलास सातभाई, मनोहर खालकर या पदाधिकाऱ्यांच्या निवेदनावर सह्या आहेतकामगार संघटनेची निवडणूक घेण्यासंदर्भात सर्व स्तरावर परवानगी मिळाली आहे. आता लवकरात लवकर निवडणूक घेणे अपेक्षित आहे. सत्ताधारी गटाला पाच महिन्यांचा बोनस कालावधी मिळाला असून, आता संघटनेने बाय बॅलेट निवडणूक घेण्यास व्यवस्थापनाला भाग पाडावे. ऑनलाइनच मध्येच व्यवस्थापनाने दिलेल्या डेमोमध्ये खूप त्रुटी असल्यामुळे ऑनलाइन निवडणुकीस आमचा विरोध आहे.- गिरीश वलवे, सहचिटणीस, एचएएल कामगार संघटना

टॅग्स :OzarओझरElectionनिवडणूक