शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

पंजाबराव देशमुख  वसतिगृहाला जागा देण्यास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 00:44 IST

मराठा समाजाच्या आंदोलनानंतर डॉ. पंजाबराव देशमुख शासकीय विद्यार्थी वसतिगृहासाठी कॅनडा कॉर्नर येथील पाटील लेनजवळची जागा देण्यास शासनाने मान्यता दिली असली तरी, या ठिकाणी वसतिगृह झाल्यास परिसरातील महिला, मुलींची सुरक्षितता धोक्यात येईल,

नाशिक : मराठा समाजाच्या आंदोलनानंतर डॉ. पंजाबराव देशमुख शासकीय विद्यार्थी वसतिगृहासाठी कॅनडा कॉर्नर येथील पाटील लेनजवळची जागा देण्यास शासनाने मान्यता दिली असली तरी, या ठिकाणी वसतिगृह झाल्यास परिसरातील महिला, मुलींची सुरक्षितता धोक्यात येईल, असा मुद्दा पुढे करीत पाटील लेन व पाटील पार्क येथील रहिवाशांनी वसतिगृहासाठी जागा देण्यास विरोध दर्शविला आहे. दरम्यान, गुरुवारी शासकीय जागावाटप तांत्रिक समितीची बैठक होऊन त्यात वसतिगृहासाठी जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला, तथापि या जागेचा ताबा कोणाकडे द्यायचा याबाबत मात्र पेच निर्माण झाला आहे.  नागरी जमीन कमाल धारणा कायद्यान्वये अतिरिक्त ठरलेली कॅनडा कॉर्नरजवळील सर्व्हे नंबर ७१८च्या प्लॉट नंबर १० मधील ८५८ चौरस मीटर एवढी जागा शासनाच्या ताब्यात असल्याने सदरची जागा ग्राहक न्याय मंचाच्या कार्यालयासाठी मिळावी, असा प्रस्ताव सर्वप्रथम देण्यात आला होता. त्यानंतर सदरची जागा राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयासाठी मिळावी, अशी मागणीही करण्यात आली होती. तथापि, शासनाच्या कायद्यानुसार शासकीय जमिनीचे वाटप करायचे असल्यास सर्वप्रथम म्हाडा गृह निर्माण विभागाला प्राधान्य देण्यात यावे, असा नियम असल्यामुळे म्हाडा या जागेबाबत विचारणा करण्यात आली होती. त्यावर म्हाडाने जमीन घेण्याची तयारी दर्शविली, तथापि यासंदर्भातील शासकीय कार्यवाही होत असताना आमदार देवयानी फरांदे यांनी सदरची जागा वसतिगृहासाठी मिळावी, अशी मागणी केल्याने याबाबत नागरी जमीन कमाल धारणा कार्यालयाने शासनाकडे सदर जागेच्या मागणीसाठी आजवर मिळालेल्या प्रस्तावांची माहिती शासनाला सादर करण्यात आली व मार्गदर्शन मागविण्यात आले.रहिवाशांची शांतता धोक्यातएकीकडे ही बैठक होत असताना दुसरीकडे पाटील पार्क भागातील महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देऊन विद्यार्थी वसतिगृहासाठी जागा न देण्याची मागणी केली. वसतिगृह केल्यास या भागात विद्यार्थ्यांचा राबता वाढेल परिणामी रहिवाशांची शांतता धोक्यात येण्याबरोबरच महिला, मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होणार असल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाNashikनाशिक