शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
5
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
6
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
7
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
8
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
9
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
10
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
11
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
12
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
13
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
14
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
15
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
16
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
17
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
18
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
19
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
20
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता

शाळेच्या जागेत जलतरण तलावाला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 00:36 IST

सिडको : येथील प्रभाग क्रमांक २८ मध्ये शाळेच्या जागेत जलतरण तलाव उभारण्याचा शिवसेना नगरसेवक दीपक दातीर यांच्या प्रस्तावास स्वपक्षातील दोघा नगरसेवकांनीच प्रभाग सभेत विरोध दर्शविल्याने संतप्त झालेल्या दातीर यांनी सभेतून काढता पाय घेतला.

ठळक मुद्देसिडको प्रभाग : सेना सदस्याच्या प्रस्तावाला स्वकियांची हरकत

सिडको : येथील प्रभाग क्रमांक २८ मध्ये शाळेच्या जागेत जलतरण तलाव उभारण्याचा शिवसेना नगरसेवक दीपक दातीर यांच्या प्रस्तावास स्वपक्षातील दोघा नगरसेवकांनीच प्रभाग सभेत विरोध दर्शविल्याने संतप्त झालेल्या दातीर यांनी सभेतून काढता पाय घेतला. सभापतींनीही हा प्रस्ताव अखेर फेटाळला. दरम्यान, प्रभागातील साफसफाई, विद्युत विभाग त्याचबरोबर घंटागाडीच्या समस्यांचे व अतिक्रमणाचा प्रश्न सुटत नसल्याने सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेऊन आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिला.सिडको प्रभाग समितीची सभा सभापती चंद्रकांत खाडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत सुरुवातीला विषयपत्रिकेवरील सर्व विकासकामांना विनाचर्चा मंजुरी देण्यात आली. त्यानंतर नगरसेवकांनी मुख्य रस्त्यांवरील किंवा नगरसेवकांच्या घर आणि कार्यालयासमोरच केवळ साफसफाई केली जाते. प्रभागातील मुख्य रस्ते वगळता गल्लीबोळातील साफसफाई होत नसल्याची तक्रार केली.

त्याचप्रमाणे पवननगर भागासह मुख्य चौकांमध्ये अतिक्रमण वाढत असून अतिक्रमण विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला. उद्यान विभागाचा कारभार व्यवस्थितपणे चालत नसून उद्यानांची देखभाल होत नसल्याने या विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. उमा पार्कसह परिसरातील कामटवाडे, अंबड भागातील नाल्यांमुळे दुर्गंधी वाढत असल्याचा आरोप करण्यात आला असून, नाल्यांच्या दुर्गंधीचा प्रश्न सुटला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवकांनी दिला.

या बैठकीसाठी नगरसेवक ङि जी सूर्यवंशी ,शाम साबळे, निलेश ठाकरे, भगवान दोंदे, दीपक दातीर, राकेश दोंदे, धनाजी लगड, साहेबराव निकम, कल्पना पांडे, रत्नमाला राणे, प्रतिभा पवार, छाया देवांग, संगीता जाधव, पुष्पा आव्हाड, सुवर्णा मटाले, कावेरी घुगे यांचेसह विभागीय अधिकारी डॉ. मयूर पाटीलांसह सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.सभापतींच्या पत्राचा परस्पर वापरप्रभाग क्रमांक २८ मध्ये जलतरण तलाव उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यासाठी सेना नगरसेवक दीपक दातीर यांनी स्वतःचे लेटरहेड न वापरता सभापती चंद्रकांत खाडे यांच्या लेटरहेडवर प्रस्ताव तयार केला. सदरचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी प्रभाग सभेत असलेल्या नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या घेत असताना सदरचा प्रस्ताव सेनेचे नगरसेवक सुवर्णा मटाले व डि जी सूर्यवंशी यांच्याकडे जाताच त्यांनी यास आक्षेप घेत सभापती खाडे यांना तुमच्या लेटरवर हा प्रस्ताव कसा असा प्रश्न उपस्थित केला. आमच्या प्रभागातील प्रश्न असल्याने आम्हाला विश्वासात का घेतले नाही. अशी विचारणा केली. दरम्यान सभापती खाडे यांच्या लेटरहेडचा नगरसेवक दातीर यांनी परस्पर वापर केल्याने त्यास आक्षेप घेत, सदरचा प्रस्ताव खाडे यांनी रद्द केला.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाcidcoसिडको