शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
2
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
3
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
4
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
5
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
6
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
7
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
8
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' मुंबई IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
9
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?
10
कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?
11
'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख
12
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
13
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
14
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
15
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
16
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
17
रील बनवताना १३व्या मजल्यावरून पडून २० वर्षीय तरुणीचा मृत्यू!
18
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 
19
'नमस्कार फ्रॉम स्पेस...', अंतराळातून शुभांशू शुक्लांचा नवीन Video; काय म्हणाले पाहा...

विधानसभेतील पराभवाचा वचपा काढण्याची संधी

By admin | Updated: January 14, 2017 00:37 IST

जिल्हा परिषद : अर्धा डझन आजी-माजी आमदारांत रंगणार सामना

 नाशिक : दोन-अडीच वर्षांपूर्वीच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या माजी आमदारांना जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी उपलब्ध होणार आहे. किमान अर्धा डझनभर आजी-माजी आमदारांमध्ये यानिमित्ताने प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष सामना रंगणार आहे.सिन्नर विधानसभा मतदारसंघाचा विचार करता आमदार माणिकराव कोकाटे यांना राजाभाऊ वाजे यांनी पराभूत करीत आमदारकी मिळविली होती. नुकत्याच झालेल्या नगरपंचायतींच्या निवडणुकीतही राजाभाऊ वाजे यांनी नगराध्यक्षपदासह शिवसेनेला बहुमत मिळवित कोकोटे यांना दुसऱ्यांदा झटका दिला. आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा कोकाटेंविरुद्ध वाजे असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत. कोकाटे यांना विधानसभा आणि नगरपंचायतींतील पराभवाचा वचपा काढण्याची संधी आहे. इगतपुरी मतदारसंघातूनही आमदार निर्मला गावित यांनी माजी आमदार शिवराम झोले व काशीनाथ मेंगाळ यांना पराभवाची धूळ चारली आहे. आता दोन्ही माजी आमदार शिवसेनेत असल्याने त्यांनी विधानसभेच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी चंग बांधला आहे. चांदवड विधानसभा मतदारसंघातही माजी आमदार शिरीषकुमार कोतवालविरुद्ध माजी जि. प.सदस्य डॉ. आत्माराम कुंभार्डे यांच्यात सामना रंगला. त्यात कोतवाल - कुंभार्डे पराभूत होऊन डॉ. राहुल अहेर यांना विजयाची संधी लाभली. दरम्यान, कुंभार्डे यांनी भाजपात प्रवेश करून नगरपंचायतीच्या निवडणुकीत पुन्हा एकदा बाजी मारत नगराध्यक्षपदी भाजपाचे भूषण कासलीवाल यांची वर्णी लावली. आता जिल्हा परिषद निवडणुकीत पुन्हा एकदा तळेगाव-रोही गटातून कोतवाल-कुंभार्डे यांचा सामना रंगणार आहे. दिंडोरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार धनराज महाले यांना पराभूत करून राष्ट्रवादी कॉँग्रेसचे माजी आमदार नरहरी झिरवाळ यांनी पुन्हा आमदारकी मिळविली. आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्त्याने माजी आमदार धनराज महाले, रामदास चारोस्कर यांना आमदार नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात पराभवाचा वचपा काढण्याची संधी मिळणार आहे. नांदगावमध्येही आमदार पंकज भुजबळ यांच्या विरोधात शिवसेना जिल्हाप्रमुख सुहास कांदे, माजी आमदार अ‍ॅड. अनिलकुमार अहेर यांना विधानसभेतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी जिल्हा परिषद निवडणुकीचा आधार घेता येईल.(प्रतिनिधी)