शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पुरवणी परीक्षेसाठी आजपासून अर्ज करण्याची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 01:50 IST

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (बारावी) पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, त्यानुसार १७ ते ३० जुलै दरम्यान दहावी व १७ जुलै तर ३ आॅगस्टदरम्यान बारावी आणि १७ ते ३१ जुलैदरम्यान बारावीच्या व्यवसाय अभ्यासक्रमाची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.

ठळक मुद्देअनुत्तीर्णांसाठी यशाचा मार्ग : उत्तीर्णांनाही गुणवत्ता, श्रेणी सुधारण्याची संधी

नाशिक : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (बारावी) पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, त्यानुसार १७ ते ३० जुलै दरम्यान दहावी व १७ जुलै तर ३ आॅगस्टदरम्यान बारावी आणि १७ ते ३१ जुलैदरम्यान बारावीच्या व्यवसाय अभ्यासक्रमाची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेचे वेळापत्रक महाराष्टÑ राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना शुक्रवार (दि. १४) पासून २४ जूनपर्यंत मंडळाच्या संकेतस्थळावर आॅनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या मुदतीनंतर २५ ते २७ जून दरम्यान विलंब शुल्क भरून अर्ज करता येईल. विद्यार्थ्यांनी माध्यमिक शाळांमार्फत अर्ज भरण्याचे आवाहन परीक्षा विभागाने केले आहे.महाराष्टÑ राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेबु्रवारी आणि मार्च महिन्यात दहावी आणि बारावीची परीक्षा घेण्यात आल्यानंतर या दोन्ही परीक्षांचा निकाल जाहीर झाले आहे. यातील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी मंडळातर्फे पुरवणी परीक्षा घेण्यात येणार असून या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार दोन्ही वर्गांच्या प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा ९ ते १६ जुलै दरम्यान घेण्यात येणार असून, शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. यापूर्वी २१ फेबु्रवारी ते २० मार्च दरम्यान बारावीची नियमित लेखी परीक्षा पार पडली होती. नाशिक विभागातून १ लाख ५९ हजार ८९७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यातील १ लाख ३५ हजार ५५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, हे प्रमाण ८४.७७ टक्के इतके आहे. तसेच १ ते २२ मार्च २०१९ दरम्यान पार पडलेल्या दहावीच्या परीक्षेस विभागातून १ लाख ८९ हजार ७५० विद्यार्थी बसले होते. यातील १ लाख ५४ हजार १९३ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ७७.५८ टक्के निकाल लागला होता. या दोन्ही परीक्षेतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसह श्रेणी सुधार करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनाही पुरवणी परीक्षेला बसता येणार आहे.अनुत्तीर्णांना संधीनाशिक विभागातून १ लाख ५९ हजार ८९७ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यातील १ लाख ३५ हजार ५५० विद्यार्थी उत्तीर्ण, तर २४ हजार ३०९ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले होते. दहावीच्या १ लाख ८९ हजार ७५० पैकी १ लाख ५४ हजार १९३ विद्यार्थी उत्तीर्ण, तर ३५ हजार ५५७ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले होते. दोन्ही मिळून ५९ हजार ८६६ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले असून, त्यांना पुरवणी परीक्षा देण्याची संधी आहे. याशिवाय उत्तीर्ण झालेले मात्र श्रेणी सुधार करून इच्छिणाºया विद्यार्थ्यांनाही परीक्षेला प्रविष्ट होता येणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकSSC Resultदहावीचा निकाल