लोकमत न्यूज नेटवर्कआझादनगर : मालेगाव महानगरपालिका निवडणुकीत शहरातील जनतेचे सर्वच पक्षाच्या मातब्बरांना डावलून एकूण ८४ सदस्यांपैकी ५० नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. मतदारांनी नवोदितांच्या खांद्यावर शहर विकासाची जबाबदारी सोपविली आहे.विद्यमान उपमहापौर शेख युनुस इसा वगळता सातपैकी सहा नवीन चेहरे त्यापैकी एकाच घराण्यातील तिनही पुरुष नगरसेवक झाल्याने निवडणूक रिंगणात उतरत एमआयएमने मनपात चंचू प्रवेश केला आहे. नुकत्याच पार पडलेल्या मनपाच्या चौथ्या पंचवार्षिक निवणुकीचा लागलेला निकाल हा सर्वांनाच अचिंबित करणारा आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे सर्वच पक्षाच्या मातब्बरांना मतदारांनी एकदा घरचा रस्ता दाखवित पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना धक्का दिला आहे. त्यातच पुन्हापुन्हा त्याच चेहऱ्यांना कंटाळत तरुण व नवीन चेहऱ्यांना मोठ्या प्रमाणावर संधी दिली आहे. शहराच्या पूर्व भागातील एकूण ६० जणांपैकी तब्बल ३८ नगरसेवक प्रथमच मनपात दाखल होत आहे. तर पश्चिम भागात १२ जणांना संधी देण्यात आली आहे, असे एकूण तब्बल ५० नगरसेवक नवीन राहणार आहेत. त्यामुळे सभागृहात नवीन चेहरेच जास्त दिसणार आहेत. त्यामुळे ज्या अपेक्षेने मतदारांनी नवोदितांना संधी दिली आहे. शहरात काँग्रेसचे एकूण २८ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यापैकी १५ नगरसेवक नवीन आहेत. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे २० पैकी १३, जनता दल ६ पैकी चार तर एमआयएमचे निवडून आलेल्या सात पैकी सहा नवीन चेहरे आहेत. एमआयएमचे विद्यमान उपमहापौर शेख युनुस इसा वगळता सर्व सहा जण नवीन असून त्यात तीन पुरुष असून तीनही एकाच घरातील सदस्य आहेत. प्रत्येकी एका जागेवर मित्र पक्ष जनता दलाचे तर प्रभाग क्रमांक १७ मध्ये एमआयएमची महिला उमेदवार विजयी झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसनेही मित्रपक्ष जनता दलाच्या सहकार्याने पाच प्रभागात आपला प्रभाव असल्याचे सिद्ध केले आहे.
मनपात ५० नवीन चेहऱ्यांना संधी
By admin | Updated: June 1, 2017 00:49 IST