शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘कालिदास’च्या खासगीकरणास नाट्य परिषदेचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 00:58 IST

महाकवी कालिदास कलामंदिरचे नूतनीकरण करण्यात आल्यानंतर त्याचे खासगीकरण करण्याचा स्मार्ट सिटीचा प्रस्ताव असून त्यामुळे सांस्कृतिक वातावरण जाऊन त्याऐवजी व्यावसायिकीकरण होणार असल्याने त्यास कलावंतांनी विरोध सुरू केला आहे.

नाशिक : महाकवी कालिदास कलामंदिरचे नूतनीकरण करण्यात आल्यानंतर त्याचे खासगीकरण करण्याचा स्मार्ट सिटीचा प्रस्ताव असून त्यामुळे सांस्कृतिक वातावरण जाऊन त्याऐवजी व्यावसायिकीकरण होणार असल्याने त्यास कलावंतांनी विरोध सुरू केला आहे. अखिल भारतीय नाट्य परिषद, नाशिक शाखेच्या वतीने पुढाकार घेतला असून त्यांनी कलामंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी योग्य ती दरवाढ करावी परंतु खासगीकरण करू नये, अशी भूमिका घेतली आहे. यासंदर्भात स्मार्ट सिटी संचालकांना पत्र दिले आहे, शिवाय शासनालादेखील निवेदन सादर केले जाणार आहे.महाकवी कालीदास कलामंदिर हे नाशिकचे सांस्कृतिक केंद्र मानले जाते. तथापि, महापालिकेने त्याची योग्य पध्दतीने देखभाल न केल्याने त्याची दुरवस्था झाली आहे. यासंदर्भात मोहन जोशी, प्रशांत दामले यांच्यासह अनेक कलावंत आणि अन्य रंगकर्मींनी आवाज उठविला आहे. गेल्या महापालिकेच्या निवडणूकीच्या तोंडावर दामले यांनी फेसबुक पेजवर कालीदासाची व्यथा मांडल्यानंतर महापालिकेतील सत्तारूढ मनसेचे नेते राज ठाकरे यांना हा विषय झोंबला होता. त्यानंतर त्यांनी कालीदासाचे संकल्पना चित्र देखील तयार करून प्रसिध्द केले होते. नाशिकची स्मार्ट सिटीसाठी निवड झाल्यानंतर त्याला मुहूर्त लाभला असला तरी त्यावेळीदेखील कामाचा ठेका दिल्यानंतर कलावंतांची मते जाणून घेण्याची औपचारीकता पूर्ण करण्यात आल्याने त्याबद्दलही नाराजी व्यक्त करण्यात आली होती, आता तर पालिकेने त्याचे खासगीकरणाचा घाट घातला असून स्मार्ट सिटी कंपनीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.  त्यामुळे या कलावंतांनी त्याच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे.  यासंदर्भात आता नाट्य परिषदेनेच पुढाकार घेऊन कालीदास कलामंदिराचे खासगीकरण करण्यास विरोध केला आहे.महाकवी कालिदास कलामंदिरचा झालेला कायापालट समाधानकारक असून, नाशिक शहराच्या सांस्कृतिक जडणघडणीस चालना देणारा आहे. आता रसिकांना नाटकांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा प्रसन्न वातावरणात आस्वाद घेता येणार आहे. मात्र कालिदासचे खासगीकरण केले जाणार असल्याचे समजल्याने ते मारक ठरण्याची शक्यता असल्याने असा निर्णय घेऊ नये, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. कालिदास कलामंदिरचे पावित्र्य राखण्यासाठी सध्याच्या भाड्यात अल्पशी वाढ केली तर हरकत नाही, पण त्याचे खासकीकरण करू नये, ठेकेदाराच्या हातात देण्यापेक्षा त्याचे नियंत्रण महापालिकेकडेच ठेवावे, अशी विनंती पत्राद्वारे नाट्य परिषद नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम, कार्यवाह सुनील ढगे यांच्याद्वारे करण्यात आली आहे.राज्याचे सांस्कृतिक मंत्री, महापौर, खासदार, आमदार, आयुक्त, स्मार्ट सिटी प्रमुख, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई, नाट्य निर्माता संघ यांना हे पत्र पाठविण्यात आले आहे. स्मार्ट सिटीचे संचालक शाहू खैरे, गुरुमित बग्गा यांना गुरुवारी (दि.२१) परिषदेतर्फे पत्र सुपूर्द करण्यात येणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका