शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

सफाई कामगारांच्या आऊटसोर्सिंगला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 12:48 AM

नाशिक : महापालिकेत स्वच्छताविषयक कामांसाठी ७०० सफाई कामगारांची भरती आऊटसोर्सिंगद्वारे करण्याच्या प्रशासनाच्या प्रस्तावाला विरोधकांनी कडाडून विरोध दर्शविला तर सत्ताधारी भाजपाने प्रस्तावाचे समर्थन केले. मात्र, विरोधाची धार पाहता महापौरांनी सावध भूमिका घेत प्रस्ताव तहकूब ठेवत अभ्यासांतीच निर्णय घेण्याचे जाहीर केले.

ठळक मुद्देप्रस्ताव तहकूब : सत्ताधारी भाजपाची भूमिका मात्र अनुकूल  विरोधानंतर अभ्यासअंती निर्णय घेण्याचे जाहीर

नाशिक : महापालिकेत स्वच्छताविषयक कामांसाठी ७०० सफाई कामगारांची भरती आऊटसोर्सिंगद्वारे करण्याच्या प्रशासनाच्या प्रस्तावाला विरोधकांनी कडाडून विरोध दर्शविला तर सत्ताधारी भाजपाने प्रस्तावाचे समर्थन केले. मात्र, विरोधाची धार पाहता महापौरांनी सावध भूमिका घेत प्रस्ताव तहकूब ठेवत अभ्यासांतीच निर्णय घेण्याचे जाहीर केले.महापालिकेत सफाई कामगारांची आऊटसोर्सिंगद्वारे भरती करण्याचा अशासकीय प्रस्ताव यापूर्वी आरोग्य समितीचे सभापती सतीश कुलकर्णी यांनी मांडला होता. मात्र, अशासकीय प्रस्तावावर तांत्रिकदृष्ट्या कार्यवाही करणे अवघड असल्याने आयुक्तांमार्फत सदरचा प्रस्ताव बुधवारी (दि.१०) झालेल्या महासभेवर आणण्यात आला. यावेळी रिपाइंच्या दीक्षा लोंढे यांनी सदरच्या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शवत स्थानिक भूमिपुत्रांना न्याय देण्याची मागणी केली. सतीश कुलकर्णी यांनी शहरात सफाई कामगारांची अपुरी संख्या लक्षात घेता आऊटसोर्सिंगद्वारे भरतीचे समर्थन केले. म्युनिसिपल कामगार सेनेचे अध्यक्ष व सेना नगरसेवक प्रवीण तिदमे यांनीही आऊटसोर्सिंगद्वारे भरतीला विरोध दर्शवत १ उद्धव निमसे यांनी सफाई कामगारांच्या कमतरतेमुळे एकाच कर्मचाºयावर कामाचा ताण पडत असल्याने भरती आवश्यक असल्याचे सांगितले. भाजपा गटनेता संभाजी मोरूस्कर यांनी जोपर्यंत शासनाकडे प्रलंबित असलेला आकृतिबंध मंजूर होत नाही तोपर्यंत आऊटसोर्सिंगद्वारे भरती करण्याची मागणी केली. मात्र, भरती करताना कंत्राटदाराला नाशिकच्याच भूमिपुत्रांना रोजगार देण्याची अट घालण्याची सूचना केली. २ सेनेचे चंद्रकांत खाडे यांनी यापूर्वी कंत्राटी पद्धतीने भरती केलेल्या कामगारांना मनपा सेवेत सामावून घेण्यात आल्याचा दाखला देत सदर भरतीप्रक्रिया आऊटसोर्सिंगऐवजी मानधनावर करण्याची सूचना केली. मुशीर सय्यद यांनीही भरतीचे समर्थन केले.विद्युत तारा भूमिगतविद्युत तारा भूमिगत करण्यासाठी महावितरण तयार आहे. त्यासाठी लागणारा खर्च व भूमिगत करण्याच्या कामात रस्त्यांचे होणारे नुकसानावरील खर्चदेखील महावितरण शासनामार्फत करणार आहे. यामुळे या कामाचा कुठलाही ताण मनपावर येणार नसून मनपाचा नाहरकत दाखला प्राप्त झाल्यानंतरच महावितरणकडून संबंधित ठेकेदारांच्या निविदाच्या देयकाची रक्कम अदा केली जाणार असल्याची माहिती आयुक्तांनी सभागृहात दिली. यानंतर उपस्थितांनी या विषयाला मंजुरी दिली. सभागृह नेता दिनकर पाटील यांनी याबाबतची गंभीर समस्येची सभागृहाला आठवण करून दिली. गजानन शेलार व बडगुजर यांनी या खोदकामात मनपाने पाईप टाकून त्या माध्यमातून केबल भूमिगत करण्याचा प्रयत्न करावा. जेणेकरून भविष्यात पुन्हा रस्त्यांची तोडफोड होणार नाही, अशी सूचना मांडली. आयुक्तांनी या सूचनेचे स्वागत केले.शाहू खैरे यांचा सभात्याग कॉँग्रेस गटनेते शाहू खैरे यांनी सांगितले, अत्यंत महत्त्वाचा असलेला सफाई कामगार भरतीचा विषय जादा विषय म्हणून सभागृहात ठेवण्यात आला. तर मेहतर-मेघवाळ समाजाच्या तरुणांना सभागृहामधील गॅलरीचा प्रवेश नाकारण्यात आला. आऊटसोर्सिंगचा बट्याबोळ झालेला असताना पुन्हा अट्टाहास का, असे सांगून खैरे यांनी सभात्याग केला.सफाई कामगारांची घोषणाबाजीसफाई कामगारांच्या आऊटसोर्सिंगचा विषय महासभेवर ठेवण्यात आल्याने सफाई कामगारांच्या संघटनांचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांनी प्रेक्षक गॅलरीत प्रवेशाची मागणी केली परंतु, प्रेक्षक गॅलरीत कोणालाही प्रवेश देण्यात आला नाही. त्यामुळे प्रेक्षक गॅलरी रिकामी होती. प्रवेश न दिल्याने सफाई कामगारांनी सभागृहाबाहेर घोषणाबाजी करत दडपशाहीचा निषेध केला. महापौर चषक भरविण्यास मान्यता४महापौर चषक स्पर्धा घेण्याच्या विषयाला मंजुरी देण्यात आली. यामध्ये फुटबॉल, कुस्ती, जिम्नॅस्टिक या खेळांच्या स्पर्धा घेतल्या जातील, त्यासाठी दीड कोटी रुपये खर्चास मान्यता देण्यात आली.