शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

विरोधक आक्रमक : न्यायालयात जाण्याची तयारी; अडीचशे कोटींच्या रस्त्याचे गौडबंगाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 00:28 IST

रस्त्यांच्या घुसखोरीवर प्रशासनाचे मौन नाशिक : महापालिकेच्या अंदाजपत्रकात कोणतीही तरतूद नाही तसेच कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता अडीचशे कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या रस्त्यांची कामे मागील दाराने मंजूर करण्यात आली. त्यानंतर काही नगरसेवकांनी प्रशासनाला पत्र दिल्यानंतरदेखील त्याबाबत प्रतिउत्तर न दिल्याने काही नगरसेवकांनी आता न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे.

ठळक मुद्देविरोधक आक्रमक : न्यायालयात जाण्याची तयारी; अडीचशे कोटींच्या रस्त्याचे गौडबंगालनाशिक : महापालिकेच्या अंदाजपत्रकात कोणतीही तरतूद नाही

नाशिक : महापालिकेच्या अंदाजपत्रकात कोणतीही तरतूद नाही तसेच कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता अडीचशे कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या रस्त्यांची कामे मागील दाराने मंजूर करण्यात आली. त्यानंतर काही नगरसेवकांनी प्रशासनाला पत्र दिल्यानंतरदेखील त्याबाबत प्रतिउत्तर न दिल्याने काही नगरसेवकांनी आता न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे.गेल्या महिन्याच्या महासभेच्या पूर्वसंध्येला शहरात २५७ कोटी रुपये खर्च करून रस्ते बांधण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आणि तो ऐनवेळी जादा विषयात आणला आणि तो मागील दाराने आणून मंजूर केला. यासंदर्भात प्रमुख विरोधी पक्षांनी फारसा विरोध केला नाही, तर काही नगरसेवकांनी आक्षेप घेणारे आणि यासंदर्भात चौकशी झाली तर त्याच्याशी आपला संबंध नसल्याचे पत्रही दिले होते. महापालिकेच्या नियमावलीनुसार महासभेच्या अगोदरच जी विषय पत्रिका प्रसिद्ध केली जाते. त्यात अशाप्रकारच्या पूर्वनियोजित विषयांचा समावेश होणे आवश्यक आहे. त्यानंतरही महत्त्वाचा विषय आला तर तीन दिवस अगोदर पूरवणी विषयपत्रिका देऊन विषय सर्वांच्या माहितीसाठी देणे आवश्यक आहे. अशा प्रक्रियेनंतरही महापालिकेकडे आपत्कालीन विषय आलाच तर तो महासभेत जादा विषयात मांडता येऊ शकतो. परंतु २५७ कोटी रुपयांचे रस्ते मंजूर करणे हे एखाद्या आपत्कालीन घटनेसारखे नसल्याने हा विषय मांडल्यानंतर त्यास आक्षेप घेण्यात आला. गोंधळात टाकणारा विषयमहापालिकेच्या या प्रस्तावात अनेक प्रकारचा गोंधळ अगोदरच असून, पाचशे मीटर रस्त्यासाठी चक्क साडेसात कोटी कोटी रुपयांची तरतूद दर्शविण्यात आली आहेत. ही रक्कम बघून अनेक जण आवाक झाले असून, एका तर सत्तारूढ पक्षाच्या एका नगरसेवकाने तर या रस्त्याला विरोध करून घरचा आहेर दिला आहे.सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे महापालिकेच्या अंदाजपत्रकात यासंदर्भात कोणतीही तरतूद नसतानादेखील अडीचशे कोटी रुपयांची कामे कशी होणार हा प्रश्न होता. लेखा परीक्षकांनी त्याबाबत प्रशासनाला पत्र दिले, परंतु त्याचा उपयोग झालेला नाही.