शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत दाहिनीचे फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 01:26 IST

स्मार्ट सिटी अंतर्गत महापालिकेने तयार केलेल्या अ‍ॅपमधील सेवा आणखी वाढवून त्या ५५ करण्यात आल्या असून, या अ‍ॅपमधील सुधारित सेवांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर विद्युत शवदाहिनीचा लोकार्पण सोहळाही फडणवीस यांच्या हस्ते पार पडला.

नाशिक : स्मार्ट सिटी अंतर्गत महापालिकेने तयार केलेल्या अ‍ॅपमधील सेवा आणखी वाढवून त्या ५५ करण्यात आल्या असून, या अ‍ॅपमधील सुधारित सेवांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर विद्युत शवदाहिनीचा लोकार्पण सोहळाही फडणवीस यांच्या हस्ते पार पडला.नाशिक जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि.५) विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेतली. यावेळी महापालिकेच्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. स्मार्ट सिटीचा आढावा घेतानाच महापालिकेने विविध योजनादेखील मांडल्या. स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या कामांची माहिती देतानाच ई-कनेक्ट अ‍ॅपमधील आॅनलाइन ५५ परवानग्यांचे लोकार्पण करण्यात आले. या अ‍ॅपमध्ये महापालिकेच्या वतीने पहिल्या टप्प्यात ४५ सेवा देण्यात आल्या होत्या. त्यात काही जुन्या सेवांचादेखील समावेश होता. त्यात आता भर घालण्यात आली असून, परवानगी आणि दाखले यासंदर्भातील ५५ प्रकारच्या सेवा आॅनलाइन करण्यात आल्याची माहिती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली. एनएमसी ई-कनेक्ट अ‍ॅपमध्ये या सेवा उपलब्ध आहेत. दरम्यान, नाशिक अमरधाममध्ये साकारण्यात आलेल्या विद्युत दाहिनीचे लोकार्पणदेखील फडणवीस यांच्या हस्ते त्याच ठिकाणाहून करण्यात आले आहे. महापालिकेच्या वतीने या ठिकाणी डिझेल शवदाहिनीची सोय करण्यात आली होती. मात्र या सेवेची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे आता नाशिक अमरधाममध्ये एक विद्युत शवदाहिनी सुरू करण्यात आली असून, आणखी एका ठिकाणी सोय केली जाणार आहे.स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत शहरात शेअर सायकलिंगचे उद्घाटन करण्यात येणार होते; मात्र काही कारणांमुळे ते होऊ शकलेले नाही. आता लवकरच या उपक्रमाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. दिवाळीपर्यंत एक हजार सायकली शहरात उपलब्ध होणार आहेत. सध्या या सायकली मुंबई नाका येथे ठेवण्यात आल्या आहेत.तासाला पाच रुपये, अर्धा तास मोफतशेअर सायकलिंगला प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेच्या वतीने प्रोत्साहन देण्यात येणार असून, पहिल्या एक तासासाठी अवघे पाच रुपये दर असणार आहे. तर अर्ध्या तासासाठी मोफत सेवा देण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.आणखी दोन उद्यानांचा विकास होणारकेंद्र शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत नाशिक महापालिकेला ४१६ कोटी रुपये देण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे. त्या अंतर्गत शहरातील शिवाजी उद्यान आणि कालिका उद्यानाचा विकास करण्यासाठीदेखील केंद्र सरकार निधी देणार आहे.

टॅग्स :Smart Cityस्मार्ट सिटीNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस