शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

भाडेतत्त्वावर घेतलेली इनोव्हा लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 00:38 IST

शहरातील पखालरोड परिसरात राहणाऱ्या दोघा संशयितांनी बदलापूर पश्चिम येथील एका नागरिकाची इनोव्हा क्रिस्टा मोटार भाडेतत्त्वावर नोटरी पद्धतीने करार करुन घेतली होती; मात्र चार  महिने उलटूनही संबंधितांनी कुठलीही रक्कम न देता मोटार लंपास केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक : शहरातील पखालरोड परिसरात राहणाऱ्या दोघा संशयितांनी बदलापूर पश्चिम येथील एका नागरिकाची इनोव्हा क्रिस्टा मोटार भाडेतत्त्वावर नोटरी पद्धतीने करार करुन घेतली होती; मात्र चार  महिने उलटूनही संबंधितांनी कुठलीही रक्कम न देता मोटार लंपास केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सरकारवाडा पोलिसांकडे बदलापूर पश्चिमच्या पोलीस ठाण्याकडून आलेल्या गुन्ह्याप्रमाणे तेथील रहिवाशी मोटारमालक राजेंद्र मारुती आगीवले (४४, रा.साईप्रसाद टॉवर) यांनी सीबीएस परिसरात २० जानेवारी रोजी भाडेतत्त्वाचा करार संशयित फरहाण जिलाणी कोकणी व आवेश जिलानी कोकणी (रा. माशाअल्ला अपार्टमेंट, पखालरोड) यांच्यासोबत केला होता. दरमहा साठ हजार रुपये भाडेतत्त्वाचा करारानुसार आगीवाले यांनी त्यांची इनोव्हा क्रिस्टा मोटार (एम.एच.०५ डीएक्स ५९८३) कोकणी यांनी सोपविली होती. मात्र या संशयितांनी त्यांना अद्याप कुठलीही रक्कम न देता वाहन परत न केल्याचे फिर्यादित म्हटले आहे. संशयितानकडे वारंवार रक्कमेची मागणी करूनही त्यांनी रक्कम देण्यास नकार दिल्याने आपली सफवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी संशयितांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक निरीक्षक शेळके करीत आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय