शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

घोटीच्या ई-टोल सेवेचा अवघ्या वीस दिवसातच बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2016 00:04 IST

लेन कायम बंद : अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने सेवा केवळ उरली नावापुरती; वाहनधारकांमध्ये अनुत्साह

 घोटी : टोल नाक्यावरील लेनमध्ये तासन्तास रांगेत उभे राहून वेळ वाया जाऊ नये यासाठी महामार्ग प्राधिकरणाच्या सूचनेनुसार मुंबई-आग्रा महामार्गावर पडघे ते धुळ्यापर्यंतच्या पाचही टोल नाक्यावर वीस दिवसांपूर्वी मोठ्या थाटामाटात शुभारंभ झालेल्या ई-टोल सेवेचा अवघ्या वीसच दिवसात बोजवारा उडाला आहे. या सेवेला ग्राहकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने ही सेवा नामधारी राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. घोटी टोल नाक्यावर असणाऱ्या दहा लेनपैकी दोन लेन या सेवेसाठी वापरात येत असल्याने या दोन्ही लेन ई-टोल वाहनाच्या प्रतीक्षेत कायम बंद राहात असल्याने इतर लेनवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतुकीची कोंडी होत आहे. टोल नाक्यावर पथकर भरताना वाहतुकीची कोंडी होऊ नये व वाहनधारकाला टोलनाक्यावरून विनाअडथळा प्रवास व्हावा या उद्देशाने मुंबई-आग्रा महामार्गावरील सर्वच टोल नाक्यावर ९ मेपासून ई-टोल सेवेचा मोठ्या थाटात शुभारंभ करण्यात आला होता. या सेवेचे उद्घाटन घोटी टोल नाक्यावर महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य व्यवस्थापक पी.जी. खोडस्कर यांच्या हस्ते दिमाखात झाले होते.या सेवेला अवघे वीस दिवस उलटत नाही तोच या सेवेचा लाभ घेण्यासाठी अपेक्षित ग्राहक मिळत नसल्याने ही सेवा काही दिवसातच बंद होण्याच्या मार्गावर आहे. दरम्यान, या सेवेचा लाभ घेण्यासाठी वाहनधारकांना आवश्यक असणारी प्रक्रिया अत्यंत किचकट असल्याने या सेवेचा लाभ घेण्यासाठी वाहनधारक उत्साही नसल्याचे समजते. (वार्ताहर)