शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

गतवर्षात डेंग्यूचे केवळ तीन रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 00:12 IST

मालेगाव : राज्यात सर्वत्र कोरोनाचा कहर सुरू असताना डेंग्यूच्या आजाराकडे मात्र दुर्लक्ष झाले. शहरात गेल्या वर्षभरात केवळ ३ डेंग्यूचे रुग्ण आढळले. संपूर्ण वर्षभरात केवळ चार जणांचे रक्ताचे नमुने तपासण्यात आले. त्यात ३ जण डेंग्यूच्या आजाराने बाधित आढळले तर एक जण निगेटिव्ह आढळला.

ठळक मुद्देमालेगाव : मागील वर्षात तपासले अवघ्या ४ जणांच्या रक्ताचे नमुने

मालेगाव : राज्यात सर्वत्र कोरोनाचा कहर सुरू असताना डेंग्यूच्या आजाराकडे मात्र दुर्लक्ष झाले. शहरात गेल्या वर्षभरात केवळ ३ डेंग्यूचे रुग्ण आढळले. संपूर्ण वर्षभरात केवळ चार जणांचे रक्ताचे नमुने तपासण्यात आले. त्यात ३ जण डेंग्यूच्या आजाराने बाधित आढळले तर एक जण निगेटिव्ह आढळला.२०११ मध्ये ४४ जणांचे रक्ताचे नमुने तपासले होते. त्यात ४ डेंग्यूचे रुग्ण आढळले होते. दहा वर्षात सर्वाधिक डेंग्यूचे रुग्ण २०१२ मध्ये आढळले होते. २०१२ मध्ये २८० जणांच्या रक्ताची तपासणी केली होती. त्यात ९२ जण बाधित तर १८८ अहवाल निगेटिव्ह आले होते. त्यानंतर २०१३ मध्ये १२८ जणांचे रक्ताचे नमुने तपासले. त्यात ४ बाधित रुग्ण आढळले. तर १२४ अहवाल निगेटिव्ह आले. २०१४ मध्ये १८५ जणांचे रक्ताचे नमुने तपासले. त्यात ५४ जण डेंग्यूने बाधित रुग्ण आढळले तर १३१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. २०१५ मध्ये ९ जणांचे रक्ताचे नमुने तपासण्यात आले. त्यात ६ जण डेंग्यूने बाधित आढळून आले. २०१६ मध्ये ३६ पैकी ७ जण, २०१७ मध्ये २४ पैकी ७ जण, २०१८ मध्ये ९८ पैकी ४१ जण, २०१९ मध्ये २४८ पैकी ५१ जण तर २०२० मध्ये ४ पैकी ३ जण डेंग्यूने बाधित रुग्ण आढळून आले.डेंग्यूचा सर्व्हे...मालेगाव शहरात गेल्या वर्षी कोरोनाचा कहर सुरू होता. त्या मानाने डेंग्यूचे ३ रुग्ण आढळून आले. गेल्या वर्षी २०२० मध्ये महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील १ हजार ३१ घरांमध्ये जावून सर्व्हे केला. त्यातील केवळ ४ जणांचे रक्त तपासणीसाठी घेण्यात आले. यात ३ जणांच्या रक्ताचे अहवाल ङेंग्यू पॉझिटिव्ह आले तर एक जण निगेटिव्ह आढळून आला. शहरात महानगरपालिकेच्या १५० आशा वर्कर, ७० आरोग्य सेविका यांनी घरोघरी जावून रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेतले. ते नमुने तपासणीसाठी प्रयोग शाळेकडे पाठविण्यात आले. यात केवळ ३ जण डेंग्यूने बाधित मिळून आले.काय असतात डेंग्यूची लक्षणे...डेंग्यूच्या रुग्णांना ताप येतो. सात ते आठ दिवस तो टिकतो.रुग्णांना डोकेदुखी व अंगदुखीचा त्रास जाणवतो. मळमळ आणि उलट्याही होतात.डेंग्यूच्या रुग्णाला अंगावर पुरळ येतात व रक्तस्राव होतो.चवीच्या संवेदनांमध्ये बदल होऊन भूकेचे प्रमाणही वाढते.सांधेदुखी, स्नायूतील वेदना आणि डोळ्यांच्या मागेही वेदना होतात.कुठल्या वर्षात किती पेशंट...२०१६ -७२०१७ - ७२०१८- ४१२०१९- ५१२०२० - ३

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य