शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील केवळ सात शेतकऱ्यांना मिळाले अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 01:47 IST

कृषी यांत्रिकीकरण योजनांचा लाभ घेण्यासाठी राज्याच्या कृषी विभागाने सुरु केलेले महाडीबीटी संकेतस्थळ गावपातळीवरील शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत असून या संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करतांना शेतकऱ्यांना विविइ अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

ठळक मुद्देकृषी यांत्रिकीकरण योजना : महाडीबीटी पोर्टल ठरतेय डोकेदुखी

नाशिक : कृषी यांत्रिकीकरण योजनांचा लाभ घेण्यासाठी राज्याच्या कृषी विभागाने सुरु केलेले महाडीबीटी संकेतस्थळ गावपातळीवरील शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत असून या संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करतांना शेतकऱ्यांना विविइ अडचणींचा सामना करावा लागत आहे. राज्यस्तरावर लॉटरी पध्दतीने काढलेल्या सोडतीत जिल्ह्यातील १३६१ शेतकऱ्यांनी विविध योजनांच्या लाभासाठी निवड करण्यात आली असून जिल्हा कृषी विभागाने अतापर्यंत ४४ शेतकऱ्यांना अनुदान देण्यास मंजुरी दिसली असून केवळ ७ शेतकऱ्यांना अनुदान प्राप्त झाले आहे. शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या फलोत्पादन, कांदा चाळ, पॅक हाउस, जुन्ंे फळबागांचे पुनरुज्जीवन,हरीतगृह, शेडनेट., प्लास्टीक मल्चींग , थिबक , तुषार सिंचन आदी विविध योजनांचे लाभ मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना एकच अर्ज करता यावा यासाठी महाडीबीटी पोर्टल सुरु करण्यात आले आहे. यावर्षी या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची ऑनलाईन लॉटरी पध्दतीने निवड करण्यात आली त्यात जिल्ह्यातील १३६१ शेतकऱ्यांची निवड झाली. निवड झालेल्या शेतकऱ्यांनी त्यानंतर कागदपत्र अपलोड करावयाचे असतात त्याला मंजुरी मिळाल्यानंतर शेतकऱ्याने संबंधीत साहित्य खरेदी करुन त्याचे बिल जमा केल्यानंतर त्यांना अनुदान देण्यात येते. ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन असल्याने कागदपत्र जमा करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. काहीवेळा सरोवरचीही अडचण नर्माण होते. यामुळे अद्याप अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहिले आहेत. जिल्ह्यातील केवळ सात शेतकऱ्यांना प्रत्यक्ष अनुदानाचा लाभ मिळाला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांना येणाऱ्या तांत्रीत अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा कृषी विभागातफेर् उपाययोजना करण्यात येत असून आता कृषी विभागातच यासाठी एका कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार असून या कर्मचाऱ्यामार्फत अपलोडची कामे करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाच्यावतीने देण्यात आली. 

यांत्रिकीकरण अनुदान जिल्ह्याची स्थितीलॉटरीत निवड झालेले शेतकरी     -     १३६१कागदत्र अपलोड होणे बाकी     -     ९५५कागदपत्र अपलोड     -    २७८अनुदान मंजुर     -     ४४पेमेंट प्रेसेसींग     -    २७अनुदान दिले     -     ७ रद्द झालेले प्रस्ताव     -    ३४

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी