सातपूर कॉलनीत शिवजन्मोत्सव उत्सव समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी समिती अध्यक्ष किशोर निकम यांनी मागील वर्षाचा आढावा सादर केला, तर खजिनदार जीवन रायते यांनी मागील वर्षाचा खर्चाचा अहवाल सादर केला. प्रमुखपाहुणे म्हणून नगरसेवक दिनकर पाटील, सलीम शेख, योगेश शेवरे, नगरसेविका डॉ.वर्षा भालेराव, छावा क्रांतिवीर सेनेचे करण गायकर, दिनकर कांडेकर, दीपक लोंढे, गणेश बोलकर, स्वप्निल पाटील आदी उपस्थित होते. यावेळी नितीन निगळ, निवृत्ती इंगोले, बाळासाहेब जाधव, समाधान देवरे, दीपक मौले, किरण बढे आदींनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी अनिल भालेराव, संजय राऊत, रामहरी संभेराव, हेमंत शिरसाठ, अनिल गडाख, स्वप्निल पाटील, विक्रम नागरे, हिरामण रोकडे, गोकुळ नागरे, गौरव बोडके, दीपक वाकचौरे, विजय अहिरे आदींसह शिवप्रेमी, नागरिक शिवजन्मोत्सव उत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो : शिवजन्मोत्सव समितीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना, नगरसेवक दिनकर पाटील समवेत सलीम शेख, योगेश शेवरे, डॉ.वर्षा भालेराव, करण गायकर, दिनकर कांडेकर, दीपक लोंढे, गणेश बोलकर, स्वप्निल पाटील, नितीन निगळ आदीसह शिवप्रेमी.