शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाबाबत केवळ नाशिक महापालिकेची यंत्रणाच दोषी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 20:43 IST

नाशिक (संजय पाठक) : कोरोनाचे संकट कमी होताना दिसत नाहीये, त्यामुळे सर्वत्र अस्वस्थता वाढत आहे, त्यामुळे महापालिकेच्या महासभेत अपेक्षेनुरूप प्रशासनाची आणि विशेषत: वैद्यकीय विभागाची खरडपट्टी काढून नगरसेवकांनी रोष व्यक्त केला. सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने ते वावगे नसले तरी त्यास केवळ निमशासकीय यंत्रणाच दोषी आहे का याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.

ठळक मुद्देनागरिकांची निष्काळजी : आरोग्य यंत्रणेकडे वर्षानुवर्षांचे दुर्लक्ष

नाशिक (संजय पाठक)- कोरोनाचे संकट कमी होताना दिसत नाहीये, त्यामुळे सर्वत्र अस्वस्थता वाढत आहे, त्यामुळे महापालिकेच्या महासभेत अपेक्षेनुरूप प्रशासनाची आणि विशेषत: वैद्यकीय विभागाची खरडपट्टी काढून नगरसेवकांनी रोष व्यक्त केला. सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने ते वावगे नसले तरी त्यास केवळ निमशासकीय यंत्रणाच दोषी आहे का याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. विशेषत: आरोग्य नियमांचे पालन न करणारे नागरिक आणि वर्षानुवर्षे मूलभूत आरोग्य सेवांकडे दुर्लक्ष करणारे लोकप्रतिनिधी तितकेच दोषी नाहीत काय? असा प्रश्न यानिमित्ताने केला जात आहे.नाशिक शहरात कोरोनाचे संकट कमी होण्यापेक्षा अधिक संख्येने वाढत आहेत. दिवसाकाठी एक हजार रुग्ण आढळत आहेत. प्रत्येक वाडी वस्तीत सापडण्यात येणाऱ्या रुग्णांमुळे चिंतेचे वातावरण आहे. सामान्यनागरिकांना दिलासा देण्यासाठी महापालिका ही पालक संस्था तर नगरसेवक पालक म्हणून धावपळ करीतआहेत. एखाद्याला कोरोना संसर्ग झाल्यास त्याला मदत करण्यासाठी त्यांना जो आटापिटा करावा लागत आहे, तो दुर्लक्ष करण्यासारखा नाही. संसर्ग झाला की रुग्णालयात दाखल होणे हे सर्वांत महत्त्वाचे कारण, गरज पडली तरी आॅक्सिजन व्हेंटिलेटर आणि अन्य उपचार वेळीच व्हावे ही भयभीत नागरिकांची माफक अपेक्षा असल्याने नगरसेवकांना आधी महापालिका आणि नंतर खासगीरुग्णालयांमध्ये आधार घ्यावा लागतो. परंतु महापालिकेच्या रुग्णालयातपुरेशा सुविधा नाहीत आणि खासगी रुग्णालयात प्रवेश करणेच कठीण अशी अवस्था आहे. त्यातच आर्थिक प्रश्न सर्वांत महत्त्वाचा असतो. अशावेळी सर्व सामान्य नागरिकांसाठी नगरसेवकांनी पोटतिडकीने बोलणे अपेक्षितच होते, मात्र केवळ जनतेला आणि मतदारांना खूश करणे हेच एकमेव उद्दिष्ट असता कामा नये, किंवा राजकारणदेखील डोळ्यासमोर असता कामा नये.शहरात कोरोना वाढला खरा, परंतु रुग्ण आढळल्यानंतर महापालिका आणि खासगी रुग्णालयांचा रोल सुरू होतो. परंतु कोरोना संसर्ग होऊच नये यासाठी नागरिक काय काळजी घेतात. ज्याच्याकडून प्रसार झाला असा विषाणू वाहक किंवा ज्याने आरोग्य नियमांचे पालन केले नाही त्यामुळे आजार ओढून घेतले ते नागरिक दोषी नाही काय? शहरात कुठेही गेले तरी शंभर टक्के मास्क, सॅनिटायझर आणि सुरक्षित अंतराचे पालन होते काय, सहज फेरी मारली तरी सर्व कटू सत्य दिसते. त्यामुळे शासन कानी कपाळी ओरडून सांगत असले तरी कुणा तरी निष्काळजी नागरिकांमुळेच संसर्ग वाढत चालला आहे, हे नाकारता येणार नाही.महापालिकेची आरोग्य यंत्रणा अपुरी पडते आहे, हे खरे आहे. खासगी क्षेत्र मोठी होत गेल्यानंतर सरकारी सेवा- सुविधा थिट्या वाटायला लागतात. त्याकडे दुर्लक्ष होते. महापालिकेने गेल्या ३५ वर्षांत आरोग्य सुविधांकडे किती लक्ष पुरवले आणि किती निधी वाढवून दिला? रस्ते डांबरीकण आणि कॉँक्रिटीकरण यासाठी एक नंबरची पसंती, इमारत बांधकामे समाजमंदिर आणि जिम यांनाही पसंती. अगदी फुटपाथवर पेव्हर ब्लॉक आणि जॉगिंग ट्रॅकवर ग्रीन जीम बसवणे यावरच अधिक भर. तो कशासाठी हे वेगळं सांगणे नकोे. त्यामुळे पायाभूत सेवा-सुविधांच्या अन्य विषयांकडे दुर्लक्षच होत गेले. तीन वर्षांपूर्वी तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पाणीपुरवठा आणि भूयारी गटारींच्या कामांसाठी सर्वाधिक निधी दिला. मात्र, जमिनीखालील कामे दिसत नसल्याने नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. २५७ कोटी रुपयांचे रस्ते करण्याचा प्रस्ताव मुंढे यांनी रद्द केला, तर आजही अनेक नगरसेवक दु:खात आहेत. परंतु वैद्यकीय विभागासाठी असा भरघोस निधी मिळत नाही म्हणून कधी दु:ख झालंय का? कोरोनाचा संकट काळ सुरू झाला त्यावेळी महापालिकेकडे अवघे पाच व्हेंिटलेटर्सच आढळले. आता गरज म्हणून त्यांची संख्या वाढली. गोरगरिबांना कधी आॅक्सिजन, व्हेंटिलेटर लागत नाही का? मग महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये या सुविधा यापूर्वीच का दिल्या गेल्या नाहीत, आॅक्सिजनच्या टाक्या यापूर्वी द्याव्या असे का वाटले नाही? कर्मचाऱ्यांच्या आता काळजी घेतली जाते, परंतु कोरोना आधीदेखील अधिकारी कमर्चारी जिवाची जोखीम पत्करून काम करत होते, त्यावेळी त्यांच्या सुरक्षितेच्या उपाययोजना का केल्या नाहीत असे अनेक प्रश्न अंतर्मुख करणारे आहेत. मुळात आता विकासाची संकल्पना बदलायला हवी. रस्ते, समाजमंदिर, ग्रीन जीम या पलीकडे जाऊन आरोग्य यंत्रणा सक्षम नसतील काय उपयोग याचा धडा कोरोनाने दिला आहे. त्याचा आता विचार करायला हवा.

टॅग्स :Nashikनाशिक