शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या काही इंचावरुन साक्षात मृत्यूची झेप...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2019 00:56 IST

जॉगिंग करून आल्यानंतर नेहमीप्रमाणे डॉ. हेमा काळे (६५) शारदानगर-मधील लहान उद्यानात प्राणायाम करण्यासाठी गेल्या. प्राणायामानंतर त्यांनी बाकावर विश्रांती घेतली अन् भ्रमणध्वनीवर मुलीशी संवाद साधला त्याचवेळी त्यांना बिबट्याच्या गुरगुरण्याचा आवाज आला.

नाशिक : जॉगिंग करून आल्यानंतर नेहमीप्रमाणे डॉ. हेमा काळे (६५) शारदानगर-मधील लहान उद्यानात प्राणायाम करण्यासाठी गेल्या. प्राणायामानंतर त्यांनी बाकावर विश्रांती घेतली अन् भ्रमणध्वनीवर मुलीशी संवाद साधला त्याचवेळी त्यांना बिबट्याच्या गुरगुरण्याचा आवाज आला. त्यामुळे त्या हळूच बाकावरून उतरून काही पावले चालल्यावर मागे वळून पाहिले असता बिबट्याने डरकाळी फोडत त्यांच्या खांद्याजवळून थेट बंगल्यात झेप घेतली.  ‘माझ्या खांद्याजवळून अवघ्या पाच इंच अंतर लांबून बिबट्याने झेप घेतली, दैव बलवत्तर होते म्हणून मी बचावले’ असे सांगताना काळे यांच्या चेहऱ्यावर ती भीती दिसून आली.शारदानगरमधील एक लहान उद्यान हे नागरिकांच्या वापरात नसून या उद्यानात काही प्रमाणात झाडे व शोभीवंत रोपे वाढलेली आहेत. उद्यानाचे दोन्ही प्रवेशद्वार बंद राहतात. या उद्यानात दररोज काळे या एकट्याच प्राणायाम करण्यासाठी जातात. नेहमीप्रमाणे शुक्रवारी (दि.२५) प्राणायाम करण्यासाठी उद्यानात गेले. यावेळी उद्यानात संपूर्ण शुकशुकाट होता. सकाळी कोवळ्या उन्हात योग-प्राणायाम झाल्यानंतर काळे अल्पवेळ विश्रांतीकरिता बाकाजवळ जाऊन बसल्या. बाकावर बसल्यानंतर त्यांना काही वेळेतच गुरगुरण्याचा आवाज कानी आला. त्यांना शंका आली, कुत्रा अशाप्रकारे गुरगुरत नाही म्हणून त्यांनी मागे मान फिरविली मात्र त्यांना काहीही दिसले नाही. बाकावरून उतरून त्या काही पावले पुढे चालत जात नाही, तोच बाकाच्या पाठीमागे असलेल्या ‘गोल्डन दुरांटा’ नावाच्या शोभीवंत झाडांच्या पाठीमागून बिबट्याने त्यांच्या अगदी जवळून शेजारच्या बंगल्याच्या दिशेने झेप घेतली.ज्या बाकावर काळे विश्रांतीसाठी बसलेल्या होत्या त्या बाकाला लागून ‘गोल्डन दुरांटा’ची लागवड शोभेसाठी करण्यात आली आहे. या झाडांच्या आडोशालाच बिबट्याने ठिय्या दिलाहोता. बिबट्याने जेव्हा डरकाळी फोडली तेव्हा काळे या प्रचंड घाबरल्या. उद्यानात त्या एकट्याच असल्याने आपण बिबट्याच्या तावडीत सापडल्याच्या विचाराने त्यांच्या अंगाचा थरकाप उडाला; मात्र सुदैवाने बिबट्याने त्यांच्यावर चाल न करता थेट त्यांना बघून भागवत यांच्या बंगल्याच्या दिशेने उडी घेतली आणि काळे यांचा जीव भांड्यात पडला.मी आयुष्यात वन्यप्राण्याला असे जवळून बघितलेले नव्हते. बिबट्याने जेव्हा उडी घेतली तेव्हा त्याचे भले मोठे भारदस्त शरीर बघून अवाक् झाले. मात्र त्यानंतर एक क्षणभरदेखील त्या ठिकाणी थांबण्याचे धाडस झाले नाही. तातडीने उद्यानातून काढता पाय घेतला आणि सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक रमेश पाटील यांच्या बंगल्यात गेले व त्यांना घडलेला प्रकार सांगितला.-डॉ. हेमा काळे, माजी वैद्यकीय अधिकारी, मनपा, नाशिक

टॅग्स :Nashikनाशिकleopardबिबट्या