शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
3
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
4
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
5
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
6
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
7
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
8
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
9
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
10
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
11
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
12
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
13
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
14
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
15
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
16
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
17
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
18
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
19
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
20
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी

पैसे दिल्यानंतरच घडते नातेवाइकांना प्रसूत महिलेच्या बाळाचे दर्शन

By admin | Updated: November 25, 2014 00:08 IST

पैसे दिल्यानंतरच घडते नातेवाइकांना प्रसूत महिलेच्या बाळाचे दर्शन

जुने नाशिक : ‘‘पैसे द्या, तरच सांगू मुलगा झाला की मुलगी, प्रायव्हेट दवाखान्यात द्यावेच लागतात ना पैसे...’’ अशा पद्धतीने जुन्या नाशकातील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील प्रसूती विभागातील काही महिला कर्मचारी प्रसूतीसाठी आलेल्या महिलेच्या नातेवाइकांकडून ‘वसुली’ करत असल्याचा गंभीर प्रकार आज (दि. २४) उघडकीस आला. रुग्णालयातील अधिकृत सूत्रांनीदेखील संबंधित महिला कर्मचाऱ्यांच्या अशा विकृत मानसिक प्रवृत्तीचा निषेध नोंदवून या प्रकाराला दुजोरा दिला आहे. पालिकेचे डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाचा बाह्यरुग्ण तपासणी व प्रसूतीचा आकडा सर्वाधिक असून, या रुग्णालयात वडाळागाव, जुने नाशिक, पंचवटी या भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपचारासाठी येतात. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून या रुग्णालयातील प्रसूती विभागातील काही ठरावीक महिला कर्मचारी प्रसूतीसाठी आलेल्या महिलांच्या नातेवाइकांकडून प्रसूती झाल्यानंतर पैसे उकळत असल्याचा आरोप काही रुग्णांनी यापूर्वीही केला होता; मात्र सोमवारी वडाळागावातील झीनतनगर येथे राहणाऱ्या ताहेरा जहांगीर शेख (प्रसूत महिलेची सासू) यांच्याकडे त्यांच्या सुनेची प्रसूती झाल्यानंतर दोन महिला कर्मचाऱ्यांनी सहाशे रुपयांची मागणी केल्याने सदर प्रकार उजेडात आला.