शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

लागंगापूर धरणात फक्त ३७ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 01:06 IST

नाशिक : उन्हाचा तडाखा वाढू लागताच जिल्ह्णातील धरणांच्या पातळीतही मोठ्या प्रमाणात घट होऊ लागली असून, मार्च महिन्याच्या प्रारंभीच नाशिककरांना पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात जेमतेम ३७ टक्के साठा शिल्लक राहिला आहे, तर धरण समूहात ४८ टक्के साठा आहे. जिल्ह्णातील अन्य धरणांमध्ये ३२ टक्के साठा असल्याने उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

ठळक मुद्देसमूहात ४८ टक्के : जिल्ह्यात जेमतेम ३२ टक्के; उन्हाचा तडाखा वाढ

 

 

नाशिक : उन्हाचा तडाखा वाढू लागताच जिल्ह्णातील धरणांच्या पातळीतही मोठ्या प्रमाणात घट होऊ लागली असून, मार्च महिन्याच्या प्रारंभीच नाशिककरांना पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात जेमतेम ३७ टक्के साठा शिल्लक राहिला आहे, तर धरण समूहात ४८ टक्के साठा आहे. जिल्ह्णातील अन्य धरणांमध्ये ३२ टक्के साठा असल्याने उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.यंदा पावसाळ्यात जिल्ह्णात सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाला असून, संपूर्ण हंगामात फक्त ८२ टक्के पाऊस नोंदविला गेला आहे. त्यातही पावसाचे माहेरघर असलेल्या चार तालुक्यांमध्येच पावसाने चांगली हजेरी लावली. अन्य तालुक्यांमध्ये जेमतेम झालेल्या पावसामुळे धरणांमध्येदेखील ७२ टक्के जलसाठा होऊ शकला. गेल्या वर्षाच्या तुलनेत जवळपास २८ टक्के धरणांमध्ये जलसाठा कमी असल्याने धरणातील पाण्याचे नियोजन करणे अवघड झाले होते. जिल्ह्णातील अन्य धरणांची परिस्थितीही यापेक्षा वेगळी नाही. पालखेडमध्ये जेमतेम १० टक्के तर कडवा ९, माणिकपुंज ७ व भोजापूर, भावलीमध्ये ६ टक्के जलसाठा शिल्लक आहे.नागासाक्याने कधीच तळ गाठल्याने त्यात पाण्याचा पत्ताच नाही. जिल्ह्णातील सर्व धरणे मिळून जेमतेम ३२ टक्के पाणी साठले असून, गेल्या वर्षी हेच प्रमाण ४८ टक्क्यावर होते. मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून उन्हाचा तडाखा वाढला असून, आता पाण्याची मागणी वाढणार आहे. प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनांबरोबरच टंचाईग्रस्त गावांसाठी टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी धरणातून पाणी उचलावे लागणार आहे. शिवाय धरणातील गळती वउन्हामुळे होणाऱ्या बाष्पिभवनाचा विचार करता ऐन मे महिन्यात पाणीटंचाईचा मोठा सामना करावा लागेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. नाशिककरांवरही पाणीटंचाईचे संकट सुदैवाने जिल्ह्यात यंदा फेब्रुवारी अखेरपर्यंत थंडीची लाट असल्याने पाण्याची मागणी कमी झाली असली तरी, धरणातील गळती, विविध आरक्षणाचा विचार करता धरणांमधून पाणी सोडावे लागले. त्याचाच भाग म्हणून ९२ टक्के भरलेले गंगापूर धरणात मार्चच्या पहिल्या आठवड्यात फक्त ३७ टक्के पाणी शिल्लक राहिले असून, समूहात ४८ टक्के साठा आहे. धरण समूहातील कश्यपी धरणग्रस्तांनी पाणी सोडण्यास विरोध दर्शविल्याने या धरणात १६८६ दशलक्ष घनफूट म्हणजेच ९१ टक्के साठा शिल्लक आहे. त्यामुळे नजीकच्या काळात नाशिककरांनाही पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे.