शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तंत्रशिक्षण प्रवेशासाठी केवळ ३९२ अर्ज निश्चित

By admin | Updated: June 10, 2017 01:32 IST

नाशिक : विभागातून अभियांत्रिकीच्या पदवी अभ्यासक्रमासाठी शुक्रवारपर्यंत (दि.९) अवघे ३४० अर्ज निश्चित झाले

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : विभागातून अभियांत्रिकीच्या पदवी अभ्यासक्रमासाठी शुक्रवारपर्यंत (दि.९) अवघे ३४० अर्ज निश्चित झाले असून, औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमासाठी केवळ ५२ अर्ज निश्चित झाले आहेत. बारावीच्या गुणपत्रिका हातात मिळाल्यानंतर अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओघ वाढून १७ जूनपर्यंत नाशिकसह विभागातून हजारो विद्यार्थी अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासप्रमासाठी आॅनलाइन अर्ज करण्याची शक्यता असून, अशा विद्यार्थ्यांसाठी इंजिनिअरिंगचे ४६ व फार्मसीचे ३८ सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहेत. तंत्रशिक्षण संचालनालयाने केलेल्या सूचनेनुसार पदविका, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीची प्रवेशप्रक्रिया केंद्रीभूत पद्धतीने राबविण्यात येत असून, या प्रक्रियेतून संस्थास्तरावरील प्रवेशासाठी उपलब्ध जागांवर प्रवेशासाठी संकेतस्थळावर आॅनलाइन पद्धतीने अर्ज करण्यास विद्यार्थ्यांनी सोमवारपासूनच (दि.५) सुरुवात केली आहे. ज्या विद्यार्थ्यांची अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे अशा विद्यार्थ्यांनी सुविधा केंद्रांवर (फॅसिलिटेशन सेंटर) अर्ज निश्चत व प्रमाणपत्रांची पडताळणी करून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अर्ज निश्चित करण्यासाठी व प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यास सुरुवात केली आहे. अशाप्रकारे अर्ज निश्चित करण्यासाठी व प्रमाणपत्रांची पडताळणी करणाऱ्या विद्यार्थ्याचेच नाव सक्षम प्राधिकारी यांनी तयार केलेल्या गुणवत्ता यादीमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. यंदा अभियांत्रिकी औषधनिर्माणशास्त्र वैद्यकीय व दंतवैद्यकीय राज्य सामायिक परीक्षा कक्षातर्फे सीईटी घेण्यात आली होती. सीईटी परीक्षेच्या निकालासोबतच इंजिनिअरिंग प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, त्यानुसार १७ जूनपर्यंत आॅनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत असून, १७ जूनपर्यंत प्रवेश अर्ज निश्चित करून अर्ज व कागदपत्र पडताळणी करता येणार आहे. १९ जूनला प्रोव्हिजनल मेरीट लिस्ट जाहीर होणार असून, २२ जूनला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.