शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

नाफेडकडून होणार केवळ एकरी बारा क्विंटल मक्याची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 00:01 IST

सायखेडा : व्यापारी वर्गाकडून भरड्या मालातील मक्याला कवडीमोल किंमत मिळत असल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने नाफेडच्या माध्यमातून एकरी बारा क्विंटल मका खरेदीला परवानगी दिली आहे. तथापि, उर्वरित मक्याचे काय करायचे असा संतप्त सवाल उत्पादकांनी विचारला आहे.

सायखेडा : (बाजीराव कमानकर) व्यापारी वर्गाकडून भरड्या मालातील मक्याला कवडीमोल किंमत मिळत असल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने नाफेडच्या माध्यमातून एकरी बारा क्विंटल मका खरेदीला परवानगी दिली आहे. तथापि, उर्वरित मक्याचे काय करायचे असा संतप्त सवाल उत्पादकांनी विचारला आहे.या संदर्भात बाजार समित्यांना पत्र प्राप्त झाले असून, निफाड खरेदी विक्री संघ लासलगाव बाजार समितीत १७६० रुपये दराने मका खरेदी करणार आहे. मका खरेदी करताना एका शेतकºयाची एकरी अवघी १२ क्विंटल मका खरेदी केली जाणार आहे. त्यामुळे उर्वरित मकाचे करायचे काय असा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर उभा राहिला उभा राहिला आहे.केंद्र शासन आणि राज्य शासन शेतमालाचे उत्पादन दुप्पट करण्यासाठी सातत्याने घोषणा करीत आहे. यासाठी योग्य प्रकारे उपाययोजना केल्या जात आहेत. शासन एकीकडे उत्पादन दुप्पट करण्याच्या उपाययोजना राबविताना दिसते तर दुसरीकडे केवळ १२ क्विंटल मका खरेदी करीत आहे. शेतकºयांना एकरी साधारणत: ४० क्विंटल मक्याचे उत्पादन होत असते. बारा क्विंटल शासन खरेदी करणार असेल तर २८ क्विंटल मक्याचे करायचे काय? असा प्रश्न शेतकºयात उपस्थित होत आहे. शासन स्वत: इतकी कमी खरेदी करून उत्पादन दुप्पट करण्याच्या धोरणाला हरताळ फासण्याचे काम करीत आहे.बाजार समित्यांमध्ये केवळ बाराशे ते तेराशे रुपये दर शेतकºयांना मिळत आहे. त्यांना कष्टाचे फळ मिळत नसल्याने फेडरेशनद्वारे मका खरेदी करण्याचा निर्णय शासनाने घेतला, मात्र एकरी १२ क्विंटल मका खरेदी करणार असल्याने उर्वरित २८ क्विंटल मक्याचे करायचे काय असा प्रश्न शेतकºयांना सतावत आहे; शासनाचे उत्पादनवाढीचे उद्दिष्ट दुप्पट असल्याने उत्पादन दुप्पट झाले आहे. अशा परिस्थितीत शासनाने सर्व मका खरेदी करावा अशी जोरदार मागणी होत आहे.-----------------------------------पोल्ट्री व्यवसाय धोक्यातरब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात मक्याची लागवड केली जाते. शेतकºयांना चांगले उत्पादन मिळते. यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पोल्ट्री व्यवसाय धोक्यात आला आणि त्याचा परिणाम मक्याच्या बाजारभावावर झाला. त्यांचे प्रमुख खाद्य असणारा मका कवडीमोल दरात विकला जाऊ लागला.-------------------------------शासन एकीकडे शेतकºयांचे उत्पादन दुप्पट होण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यामुळे मक्याचे उत्पादन दुप्पट झाले. एकरी किमान ४० क्विंटल मक्याचे उत्पादन शेतात मिळते. शासन मात्र अवघे बारा क्विंटल मका खरेदी करणार आहे. उरणारा २८क्विंटल मका विकायचा कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने एकरी ४० क्विंटल मका खरेदी करण्याचे आदेश फेडरेशनला देऊन शेतकºयांना दिलासा द्यावा.- विकास रायते, मका उत्पादक शेतकरी,खडक माळेगाव

टॅग्स :Nashikनाशिक